• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • Janmashtami 2021: तुमच्या राशीनुसार श्रीकृष्णाला दाखवा नैवेद्य; नक्की मिळेल कृपाशीर्वाद

Janmashtami 2021: तुमच्या राशीनुसार श्रीकृष्णाला दाखवा नैवेद्य; नक्की मिळेल कृपाशीर्वाद

श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या सोमवारी म्हणजे 30 ऑगस्टला आहे. तुमच्या राशीला लाभेल असा नैवेद्य अर्पण कराल तर नक्कीच मिळेल अपेक्षित फळ. जाणून घ्या राशीनुसार पूजन

  • Share this:
मुंबई, 28 ऑगस्ट:  भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा (Shrikrishna) जन्मोत्सव हिंदू धर्मात भक्तांकडून दर वर्षी जन्माष्टमी/गोकुळाष्टमी (Janmashtami) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला केवळ भारतातच नाही तर परदेशातही विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे भक्त मिरवणुका काढतात, त्यांची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव दर वर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. या वर्षी हा सण 30 ऑगस्ट (सोमवारी) रोजी उत्साहात साजरा केला जाईल. या दिवशी भाविक उपवास करून रात्रभर श्रीकृष्णाची उपासना करतील. त्यानंतर पारण मुहूर्तानुसार भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात येईल. हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला 'व्रतराज' असं संबोधलं जातं. असं मानलं जातं, की या दिवशीचं व्रत केल्याने व्यक्तीला वर्षभर करण्यात येणाऱ्या व्रतांपेक्षाही अधिक शुभ फलप्राप्ती होते. केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहिती झाले तर, ताटात जेवणं बंद कराल ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी अनेक चांगले योग जुळून येत आहेत. त्यामुळे या वर्षी जी व्यक्ती जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा-आराधना करील, स्वतःच्या राशीनुसार नैवेद्य अर्पण करील, त्या व्यक्तीवर नक्कीच देवाची कृपा होईल. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या राशीनुसार श्रीकृष्णाला कशाचा नैवेद्य अर्पण करणं योग्य असेल, हे जाणून घेऊ या. लग्नाबद्दलचे सगळेच Secret उघडतात हस्तरेषा; पाहा कोणती रेषा महत्त्वाची श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्यामध्ये असावा पुढील गोष्टींचा समावेश मेष : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीच्या दिवशी देवाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवणं लाभदायक ठरेल. यामुळे श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या सर्व इच्छादेखील पूर्ण होतील. वृषभ : या राशीच्या व्यक्तींनी या वर्षी जन्माष्टमीला लोण्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुम्हाला श्रीकृष्णाचे आशीर्वाद तर मिळतीलच, तसंच आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्तीही मिळेल. मिथुन : या राशीच्या व्यक्तींनी गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप आणि दही यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी राहील. तसंच तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. कर्क : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीला श्रीकृष्णाला दूध आणि केशर याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुम्हाला संतानसुख मिळेल. तसंच तुमची सर्व कामंही यशस्वीरीत्या पूर्ण होतील. सिंह : या राशीच्या व्यक्तींनी या वर्षी जन्माष्टमीला बालकन्हैयाला लोणी आणि खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसंच तुम्हाला कामामध्ये पदोन्नती मिळू शकेल. कन्या : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला खव्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तूळ : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी श्रीकृष्णाला गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुम्हाला सर्व रोगांपासून मुक्ती मिळेल. तसंच जीवनात आनंदही येईल. वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला केवळ दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतील. तसंच तुमची पैशाची चणचणदेखील दूर होईल. धनू : या राशीच्या व्यक्तींनी श्रीकृष्णाला फळं आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. तसंच तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. मकर : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला लोणी-खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. तसंच कोर्टात केस चालू असेल, तर त्यातही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कुंभ : या राशीच्या व्यक्तींनी जन्माष्टमीला श्रीकृष्णाला बालुशाहीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल. तसंच कुटुंबातल्या व्यक्तींचं सहकार्यही मिळेल. मीन : या राशीच्या व्यक्तींनी या जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला केशराचं दूध आणि पांढऱ्या रंगाची मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे प्रेमसंबंधांत यश मिळेल. तसंच तुमच्यावर असलेल्या कर्जापासून मुक्तता मिळू शकेल. (साभार : astrosage.com) (Disclaimer: वरची माहिती सामान्यपणे प्रचलित ज्ञानावर आधारित आहे.)
First published: