Home /News /astrology /

Shani Jayanti: शनी जयंतीनंतर सुरू होणारं वक्री भ्रमण 4 राशींना ठरणार प्रतिकूल

Shani Jayanti: शनी जयंतीनंतर सुरू होणारं वक्री भ्रमण 4 राशींना ठरणार प्रतिकूल

सुमारे 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत असताना शनिजयंतीचा योग जुळून आला आहे. त्यानंतर 5 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होत आहेत. कुठल्या राशींनी जपून राहायचं या काळात?

    दिल्ली, 27 मे: प्रत्येक माणसाच्या जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल घटना घडत असतात. नऊ ग्रह, 27 नक्षत्रं आणि 12 राशींमुळे अशा घटना माणसाच्या जीवनात घडतात, असं ज्योतिषशास्त्राच्या (Jyotish Shastra) अभ्यासकांचं मत आहे. नऊ ग्रहांमध्ये राहू (Rahu), केतू (Ketu) आणि शनि (Shani) या ग्रहांविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात भीती असते. हे तीनही ग्रह कष्ट, अपयश, तोटा, आजारपणासारखी काही प्रतिकूलच फळं देतात, असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. त्यातही शनीची साडेसाती (Sade Sati) म्हटलं, की अनेकांची भीतीने गाळण उडते. सध्या शनि महाराज कुंभ या स्व राशीत गोचर करत आहेत. त्यातच 30 मे रोजी शनी जयंती आहे. सुमारे 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत असताना शनिजयंतीचा योग जुळून आला आहे. त्यानंतर 5 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होत आहेत. शनीचं हे वक्री भ्रमण काही राशींना प्रतिकूल ठरणार आहे. 12 पैकी चार राशींनी (Zodiac Signs) या गोचर काळात जरा सांभाळून राहणं आवश्यक आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सध्या शनीचं कुंभ राशीत सुरू असलेलं गोचर आणि 30 मे रोजी असलेली शनिजयंती हा एक दुर्मीळ योग मानला जात आहे. त्यातच 5 जूनला शनी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. 23 ऑक्टोबरपर्यंत शनी वक्री असणार आहे. हा 141 दिवसांचा कालावधी सर्व राशींवर परिणाम करणारा ठरेल. त्यातही खासकरून मेष, कर्क, मकर आणि कुंभ या चार राशींना शनीचं वक्री भ्रमण प्रतिकूल ठरू शकतं, असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे.  वाचा - Rashi Parivartan 2022: जूनमध्ये 5 ग्रहांच्या स्थितीत होणार मोठे बदल; या राशीचे लोक होणार मालामाल मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींना वक्री शनी त्रासदायक ठरू शकतो. या कालावधीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळणं आवश्यक आहे, अन्यथा अडचणी वाढू शकतात. या काळात वैवाहिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. घरात वाद-विवाद, भांडणं होऊ शकतात. तणाव आणि गैरसमज वाढू शकतात. कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींना हा काळ अनेक बाबतींत त्रासदायक ठरू शकतो. अपघात, दुखापत टाळण्यासाठी वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. आर्थिक स्थिती बिघडू शकते किंवा उत्पन्नात घट होऊ शकते. या काळात कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे मोठे निर्णय घेणं टाळावं. खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. मकर (Capricorn) : मकर राशीला सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. त्यातच शनी वक्री होणं या राशीसाठी लाभदायक नाही. या काळात करिअरवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसेल. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. कटू बोलण्याने किंवा चिडल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. धनहानीचे योग आहेत. या कालावधीत धैर्य आणि संयम ठेवणं गरजेचं आहे. कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीच्या वक्री भ्रमणामुळे अशुभ फळं मिळू शकतात. खासगी आयुष्यात अडचणी निर्माण होतील. विवाह किंवा नातेसंबंध जुळत असतानाच मोडू शकतात. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होतील. या कालावधीत गुंतवणूक, विवाह करणं टाळावं. कुटुंबीयांशी वागणूक चांगली ठेवावी.
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Shani Jayanti

    पुढील बातम्या