Home /News /astrology /

जुलै महिन्यात शनीच्या वक्री भ्रमणामुळे 3 राशींवर संकट; मुक्तीसाठी करा हे उपाय

जुलै महिन्यात शनीच्या वक्री भ्रमणामुळे 3 राशींवर संकट; मुक्तीसाठी करा हे उपाय

Shani Gochar July 2022 : जुलै महिन्यात शनीचं मकर राशीत वक्री भ्रमण आहे.

मुंबई, 25 जून : ज्योतिषशास्त्रात (Jyotish shastra) ग्रहांच्या राशी परिवर्तनाला (Transit) विशेष महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतो.  ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. सर्वाधिक भीती कोणत्या ग्रहाची वाटत असेल तर तो म्हणजे शनी आणि हाच शनी पुढच्या महिन्यात रास बदलणार आहे आणि त्याचा तीन राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. नवग्रहांमध्ये गुरु (Jupiter) आणि शनी (Saturn) हे दोन ग्रह अत्यंत संथ गतीनं भ्रमण करतात. त्यातही शनीचं भ्रमण अधिक संथ गतीनं होतं. शनी म्हटलं की, लोकांची भीतीने गाळण उडते. शनीची साडेसाती, अडीचकी, महादशा लागली की, नुकसान होणार असा काहीसा समज लोकांमध्ये आहे. शनी ही न्याय देवता आहे. तो कर्मानुसार न्याय देतो. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या जीवनात जसं कर्म केलंय तशीच फळं त्याला शनी देतो. शनी सध्या कुंभ (Aquarius) या स्वराशीत आहे. येत्या जुलै महिन्यात तो मकर (Capricorn) या स्वराशीत वक्री (Retrograde) होत आहे. 12 जुलै 2022 रोजी मकर या स्वराशीत वक्री होत आहे. जानेवारी 2023 पर्यंत शनी मकर राशीत वक्री असेल. शनीचं हे वक्री भ्रमण निश्चित सर्व राशींवर परिणाम करणारं ठरेल. परंतु, 12 पैकी तीन राशींसाठी हा कालावधी परीक्षा बघणारा असेल.  शनीचं हे वक्री भ्रमण मेष, सिंह आणि धनु या तीन राशींसाठी प्रतिकूल ठरणार आहे, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. हे वाचा - Fish Aquarium: तुमच्या एक्वेरियममधील मासे लगेच मरतायत? या 5 टिप्स कायम ध्यानात ठेवा मेष (Aries): या राशीच्या लोकांच्या कामांमध्ये 20 दिवसांनंतर अडथळे निर्माण होऊ शकतात. मेष राशीचे लोक जितका पैसा कमवतील त्यापेक्षा अधिक पैसा त्यांना खर्च करावा लागेल. कुटुंबात अशांतता निर्माण होईल. नोकरी, व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. मुलांचं शिक्षण हा चिंतेचा विषय ठरेल. कुटुंबात काही अशुभ घटना ऐकायला मिळतील. अशा परिस्थितीत शनिची कृपादृष्टी राहावी यासाठी मंगळवारी आणि शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यावं. मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा आणि शनी चालिसा पठण करावं. मनोभावे उपासना केल्यास समस्यांपासून सुटका होईल. सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांसाठी आगामी सहा महिने अडचणीचे ठरतील. नोकरी-व्यवसायात तोटा सहन करावा लागेल. कोर्ट-कचेरी प्रकरणात अडकू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या विरोधात षड्यंत्र रचतील. कुटुंबात अशांतता जाणवेल. घेतलेलं कर्ज परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडू शकते. या समस्यांपासून सुटका व्हावी, याकरिता दर शनिवारी गायीला पोळी खायला द्यावी. घरात शनिमंत्राचा जप करावा. हे वाचा - Daily Horoscope : आधीच्या कामांचं फळ मिळेल, नव्या संधीचेही संकेत; तुमच्या राशीत काय पाहा राशिभविष्य धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांवर 20 दिवसानंतर शनीची कुदृष्टी असेल. जुनं दुखणं पुन्हा उद्भवेल. दिलेले पैसे बुडतील. अचानक नवा आजार होण्याची शक्यता आहे. मेहनतीचं अपेक्षित फळ मिळणार नाही. कुटुंबात कलह वाढेल. शनी महाराजांची नाराजी दूर करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. सिंह राशीच्या लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं. तसंच दर शनिवारी गरजू लोकांना मोहरीचं तेल दान करावं. (सूचना - हा लेख सर्वसामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या