मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Shani Vakri 2022: शनीच्या वक्र चालीमुळे ‘या’ राशींना होणार फायदा; मोठ्या धनलाभाचे संकेत

Shani Vakri 2022: शनीच्या वक्र चालीमुळे ‘या’ राशींना होणार फायदा; मोठ्या धनलाभाचे संकेत

 आपल्या राशींवर काही ग्रहांचा प्रभाव असतो. त्यामुळे या ग्रहांच्या चालींचा राशींवरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोणत्याही ग्रहाची उलटी चाल (वक्री अवस्था), किंवा दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण याचा केवळ त्या ग्रहाशी संबंधित राशींवर नव्हे; तर सर्वच राशींवर प्रभाव पडत असतो.

पुढे वाचा ...
     मुंबई, 18 जून-  आपल्या राशींवर काही ग्रहांचा प्रभाव असतो. त्यामुळे या ग्रहांच्या चालींचा राशींवरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोणत्याही ग्रहाची उलटी चाल (वक्री अवस्था), किंवा दुसऱ्या राशीत होणारं संक्रमण याचा केवळ त्या ग्रहाशी संबंधित राशींवर नव्हे; तर सर्वच राशींवर प्रभाव पडत असतो. जून महिन्याच्या सुरूवातीला (5 जून 22) शनी ग्रहाची कुंभ राशीत वक्री चाल (Shani Vakri 2022) सुरू झाली आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत (Shani Vakri 2022 Date) शनी याच स्थितीत असणार आहे. तब्बल 141 दिवस शनी वक्री अवस्थेत राहणार असल्यामुळे बऱ्याच राशींना फायदा (Shani Vakri benefits) होणार आहे. शनिदेवाच्या प्रकोपाला सर्वच लोक घाबरून असतात. शनी महादशा, शनी अडीचकी, शनीची साडेसाती आणि सोबतच शनीची दृष्टी आणि चालही लोकांवर तेवढाच प्रभाव टाकते. कोणत्याही ग्रहाच्या चालीमुळे काही राशींना फायदा, तर काहींना तोटा होतो. सध्या शनीच्या या वक्री चालीचा (Shani Vakri effect) कोणत्या राशींना काय फायदा होईल, हे जाणून घेऊयात. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मेष रास : ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, शनीच्या वक्र चालीचा मेष (Shani Vakri effect on Aries) राशीच्या व्यक्तींना सर्वांत जास्त फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी याचा विशेष प्रभाव दिसून येईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना या काळात चांगली संधी चालून येईल. या कालावधीमध्ये आर्थिक सुबत्ता वाढेल, आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील. (हे वाचा:खूपच रोमँटिक असतात या तारखेला जन्मलेले लोक; कुणालाही करू शकतात आकर्षित ) धनु रास : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या धनु (Shani Vakri effect on Sagittarius) राशीच्या व्यक्तींना हा काळ फायद्याचा राहील. तसंच या कालावधीमध्ये पैशांची चणचण दूर होईल. भविष्यासाठी एखादी चांगली गुंतवणूक करणंही शक्य होईल. वृश्चिक रास: शनीची वक्री चाल ही वृश्चिक (Shani Vakri effect on Scorpio) राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये फायद्याची ठरेल. तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरी असो वा व्यवसाय, सर्व क्षेत्रांमध्ये तुमची प्रगती निश्चित आहे. आर्थिक अडचणी संपतील, आणि मोठ्या गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहतील. हा काळ गुंतवणुकीसाठी फायद्याचा आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत मोठं यश मिळेल. कुंभ रास : शनीचा थेट प्रभाव असलेल्या राशींपैकी एक म्हणजे कुंभ (Shani Vakri effect on Aquarius) रास. या राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल ही फायद्याची ठरणार आहे. या कालावधीमध्ये कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल. विद्यार्थ्यांनाही शनीच्या कृपेने मनासारखं यश मिळेल. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्यासाठी याचा फायदा होईल. सोबतच या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल. अशा प्रकारे शनीच्या वक्री चालीचा कुंभ राशीसोबतच इतर राशींनाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या