मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Sarva Pitru Amavasya Horoscope : आज सर्वपित्री अमावस्या; पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवसाचं तुमचं राशिभविष्य

Sarva Pitru Amavasya Horoscope : आज सर्वपित्री अमावस्या; पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवसाचं तुमचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

Sarva Pitru Amavasya Horoscope : आज सर्वपित्री अमावस्येला कुणाच्या राशीत काय? बाराही राशींचं भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

आज दिनांक 25 सप्टेंबर 2022. वार रविवार. आज चंद्र उत्तरा नक्षत्रात भ्रमण करेल. आज सर्वपित्री अमावस्या आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज षष्ठ चंद्र आहे. तुमचा स्वभाव तापट आहे. राशीतील राहू तणाव निर्माण करेल. वयाने मोठ्या मित्रमंडळींपासून लाभ होतील. घरातील कामात मन रमवा. कुटुंबाची भेट होईल. दिवस मध्यम.

वृषभ

आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र पंचम स्थानात उत्तम आहे. जन संपर्क घडेल. दिवस शुभ.

मिथुन

चतुर्थ स्थानात चंद्र धार्मिक, कौटुंबिक कामात यश देईल. आर्थिक लाभ घडतील. प्रवास योग येतील. कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम.

कर्क

आज चंद्र भवांडासंबंधी मानसिक ताण होईल असे सुचवत आहे. मन अशांत राहिल. आर्थिकदृष्टया दिवस उत्तम जाईल. प्रवास टाळा. उपासना करा. दिवस चांगला आहे.

सिंह

शनी सध्या मानसिक, शारीरिक क्लेश देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. द्वितीय स्थानातील चंद्र आज काम, व्यवसायात लाभ देईल. दिवस मध्यम आहे.

कन्या

मानसन्मान, आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. दिवस उत्तम आहे.

तूळ

आज दिवस कार्यक्षेत्रासाठी वेळ द्या असं सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र भरपूर आर्थिक लाभ देईल. दिवस उत्तम.

वृश्चिक

आईवडिलांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंधसुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्य घडतील. संततीसाठी दिवस बरा.

धनु

राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करेल. चंद्र आर्थिक अडचणी आणेल. कुटुंब सुख कमी मिळेल. व्यवसाय उत्तम राहिल. घरात काम भरपूर करावं लागेल. दिवस मध्यम.

मकर

शनी सध्या तुमच्या राशीस्थानात आहे. चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. घरात कलह होऊ शकतात. शांत रहा. लवकरच बदल होईल. दिवस बरा.

कुंभ

आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणेसुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. मानसिक ताण देईल. दिवस मध्यम आहे.

मीन

छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. दिवस उत्तम.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs