• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • साप्ताहिक राशीभविष्य: या तीन राशींना आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल, पाहा तुमचा आठवडा कसा जाईल

साप्ताहिक राशीभविष्य: या तीन राशींना आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल, पाहा तुमचा आठवडा कसा जाईल

हा आठवडा कसा जाणार?

हा आठवडा कसा जाणार?

कृष्णजन्माष्टमीने सुरू होणाऱ्या या आठवड्यात सूर्य, मंगळ सिंह राशीत, बुध-शुक्र कन्या राशीत तर राहू वृषभ आणि केतू वृश्चिक राशीत भ्रमण करीत आहेत. तुमच्या आय़ुष्यावर या ग्रहस्थितीचा काय होणार परिणाम?

  • Share this:
आज दिनांक 29 ऑगस्ट 2021, रविवार. तिथी श्रावण कृष्ण  सप्तमी. या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहा. सूर्य ,मंगळ,सिंह राशीत ,बुध शुक्र कन्या राशीत तर राहू वृषभ व केतू वृश्चिक राशीत भ्रमण करीत आहेत. गुरु व शनि अनुक्रमे कुंभ  आणि मकर राशीत वक्री अवस्थेत असून चंद्र सकाळी 10.35 पर्यंत मेष राशीत आहे. त्यानंतर  तो  वृषभ राशीतून भ्रमण करेल.या आठवड्यात 30  ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल. 31 ला मंगळागौरी पूजन  व गोपाळकाला असेल. पाहूया सर्व राशींना हा आठवडा कसा जाईल ते. मेष राशीच्या पंचम व षष्ठ स्थानातील ग्रह  सामाजिक  व  शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणार आहे .परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. समारंभाचे आयोजन कराल. व यशस्वी पणे पार पाडाल. उत्तरार्ध  अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीला होणारा चंद्र राहू योग मानसिक ताण दर्शवतो. कामात दिरंगाई होईल. पण गुरुकृपा सर्व ठीक करेल. वृषभ राशीतील चंद्र राहू योगाने थोडा मानसिक संभ्रम राहील. आर्थिक बाजु चांगली. चतुर्थात असलेले ग्रह  कुटुंब सुख, घरातली गुंतवणूक, प्रॉपर्टी संबंधी घडामोडी दाखवत आहेत. पंचमात बुध शुक्र संतती साठी शुभ. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य ठीक राहील. घरा मध्ये शुभ घटना, समारंभ होतील. उत्तरार्ध अनुकूल. मिथुन या सप्ताहात घरांमधे मोठी  पूजा इत्यादी घडेल,  धार्मिक समारंभासाठी खर्च होईल.घर वाहन या साठी अत्यंत शुभ काळ. नकारात्मक मानसिकता ठेऊ नका. ओम महालक्ष्मये  नमः  या मंत्राचा जप करणे फायद्याचे ठरेल .व्यय स्थानात राहू चंद्र थोडा खर्च वाढवेल. हॉस्पिटल ला भेट द्यायची गरज पडेल. गुरु ची उपासना करावी. उत्तरार्ध अनुकूल. कर्क या आठवड्यात गुरू अष्टमात असून आर्थिक प्राप्ती होईल. तेजस्वी वाणी होईल आणि कलाकारांना शुभ फळ देईल. आर्थिक बाजू ठीक राहील. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. पैतृक संपत्ती काही निर्णय होतील. जोडीदाराची काळजी घ्या. उत्तरार्ध अनुकूल. सिंह आठवड्यात सुरवातीला चंद्र राहू ग्रहण योग कार्य क्षेत्रात अडचणी निर्माण करेल. जास्तीचे काम पडेल. हाती घेतलेल्या कामात अडथळा निर्माण होईल. पण आर्थिक लाभ होतील. वसिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. मुलांसाठी शुभ काळ. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. कन्या या आठवड्यात भाग्यात चंद्र राहू, धार्मिक पूजाअर्चा किंवा समारंभ घडवून आणतील. कोणाच्या मदतीची अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे  राशीतील बुध उच्च बुद्धिमत्ता, वक्तृत्व देईल. तर शुक्रवार आकर्षक व्यक्तिमत्त्व प्रदान करेल. सध्या महत्त्वाचा बाबतीत निर्णय घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका. तुला अष्टमात राहू चंद्र आठवड्याची सुरवात धीमी व तणाव पूर्ण करतील. पोटाचे किंवा कंबरेचे विकार डोके वर काढतील. घरातली काही आवश्यक कामे पार पाडावी लागतील. गुरुकृपा राहील. आर्थिक लाभ उत्तम होतील. उत्तरार्ध अनुकूल. व्यय स्थानातील ग्रह खर्चाचे प्रमाण वाढते ठेवतील. जपून रहा. वृश्चिक सुरवातीला  चंद्र राहू योग  व नंतर अष्टमात चंद्र आठवड्याची सुरवात जरा तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक धैर्य खचु देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका .जोडीदाराकडून जास्त अपेक्षा नको. उत्तरार्ध जोरदार लाभ होतील. आर्थिक बाजु सावरेल. घरात काही समारंभ होतील. धनु षष्ठ चंद्र  राहू योगाने थोडा मानसिक त्रास होईल. मात्र भाग्य साथ देईल. वडीलधारी मंडळी मदत करतील. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. उत्तर लाभ होतील. बदली, प्रमोशन होऊ शकते. दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरुकृपा राहील उपासना करावी. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. मकर या सप्ताहात चंद्र राहू योगाचे परिणाम दिसतील. संतती विचित्र वागेल. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे निर्माण होतील. राशीतील शनि नैराश्य वादी स्वभाव करेल. मात्र आर्थिक प्राप्ती, पैतृक संपत्ती संबंधी काही निर्णय घ्याल. प्रवास टाळा. कोणाशी वाद, बोलाचाली करू नका. भाग्यात बुध शुक्र धार्मिक कार्य घडवून आणेल. सप्ताह अनुकूल. कुंभ गृह  कलह,मातृ चिंता  ,वाहन  दुरुस्ती  असा सुरवातीला अनुभव येईल. जोडीदार मदत करील. पण वाद नको. अष्टमात शुक्र बुध आर्थिक लाभ  देतील. पण प्रकृती चिंता सतावू  शकतील. कार्यक्षेत्रात उत्तम संधी लाभेल. पूर्वार्ध अनुकूल. मीन तृतीय चंद्र राहू  गैरसमज, चुकीचे संदेश यातून कटकटीचा जाऊ शकतो. व्यवसाय. धंद्यात अचानक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती कराल. लहानसहान समारंभ किंवा पुजा इत्यादी घडेल. आरोग्य ठीक राहील. आर्थिक बाजू चांगली. उत्तरार्ध अनुकूल आहे. शुभम  भवतु!!
First published: