मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थीदिनी बाप्पाची तुमच्यावर काय कृपा होणार? पाहा आजचे राशिभविष्य

Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थीदिनी बाप्पाची तुमच्यावर काय कृपा होणार? पाहा आजचे राशिभविष्य

Sankashti Chaturthi Horoscope : आज आषाढ कृष्ण तृतीया/चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी. पाहा तुमचं राशिभविष्य.

Sankashti Chaturthi Horoscope : आज आषाढ कृष्ण तृतीया/चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी. पाहा तुमचं राशिभविष्य.

Sankashti Chaturthi Horoscope : आज आषाढ कृष्ण तृतीया/चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी. पाहा तुमचं राशिभविष्य.

आज दिनांक 16 जुलै 2022, शनिवार. आज आषाढ कृष्ण तृतीया /चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय रात्रौ 9.53 वाजता होईल. चंद्र आज कुंभ राशीत भ्रमण करेल. श्री गणरायाच्या चरणी वंदन करून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या लाभ स्थानात चंद्र असून मित्रमैत्रिणी भेट संभवते. अनेक लाभ होतील. घरात काही शुभ घटना घडतील. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम.

वृषभ

आज दशम चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम.

मिथुन

राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ.

कर्क

आज अष्टम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण क्लेश देणारे आहे. सप्तमात शनी कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवी बुध मार्ग दाखवतील. दिवस मध्यम आहे.

सिंह

राशीच्या सप्तम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. जोडीदार आनंदी राहिल. खरेदी कराल. शुक्र लाभ देईल. दिवस उत्तम.

कन्या

आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण घातक असून घरासाठी अशुभ आहे. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम आहे.

तूळ

कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

चतुर्थ स्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस बरा आहे.

धनु

आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहिल. दिवस मध्यम.

मकर

आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस उत्तम .

कुंभ

आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. मंगळ तृतीय स्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल.

मीन

आज घरेलु जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs