• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • आजचं राशीभविष्य : कर्क राशींना आर्थिक नुकसानाचा आहे दिवस; वाचा तुमचं राशीभविष्य

आजचं राशीभविष्य : कर्क राशींना आर्थिक नुकसानाचा आहे दिवस; वाचा तुमचं राशीभविष्य

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

आज सोमवार दिनांक 26 जुलै 2021 आषाढ कृष्ण तृतीया. चंद्र आज कुंभ राशीत भ्रमण करीत असून तिथे तो गुरू सोबत असेल. सूर्य कर्क राशीत आहे. पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

  • Share this:
मेष चंद्राचे लाभ स्थानावरून भ्रमण फायदेशीर ठरेल. चतुर्थ सूर्य बुध घरातल्या वस्तूंची दुरुस्ती  नवी खरेदी करेल. संतती चिंता कमी होईल. गुरू चंद्र शुभ योगाची फळे मिळतील. अध्यात्मिक साधना सफल होईल. दिवस शुभ. वृषभ आज आठवड्याचा पहिला दिवस कार्यक्षेत्रात मोठी शुभता घेऊन येणार आहे. या आठवड्यात मंगळाचे स्वामित्व तुमच्या गृहसौख्य आणि आई वडील यावर राहील, त्यादृष्टीने काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. खर्च वाढणार आहे. दिवस चांगला आहे. मिथुन आज राशीच्या भाग्य स्थानातील गुरू चंद्र अतिशय शुभ फळ देणारा ठरेल. प्रवास, धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कर्क काही कारणाने आज तुमचा दिवस कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान  किंवा खर्च, शारीरिक त्रास संभवतात. मात्र नामजप, साधना करण्यासाठी फार शुभ दिवस आहे. सिंह मंगळ शुक्र आणि चंद्र गुरूच्या प्रभाव क्षेत्रातून आजचा दिवस जोडीदाराला शुभ फळ देणारा ठरेल. व्यवसाय उद्योगात काही नवीन घटना घडतील. धनलाभ होईल. दिवस चांगला जाईल. कन्या आज दिवस पुन्हा गडबडीत जाईल. थकवा जाणवेल. पण षष्ठ स्थानातील गुरू चंद्र नोकरदार व्यक्तींना उत्तम फळ देतील. आईकडील नातेवाईक भेटतील. खर्च बेताने करा. दिवस शुभ. तुला पंचमात चंद्र गुरू उत्तम संतती सुख देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण, परीक्षा याकरता शुभ काल. तुमचा नाव लौकिक वाढेल. दिवस उत्तम आहे. वृश्चिक घर आणि कुटुंबिय यांसाठी आजचा दिवस सत्कारणी लागेल. चतुर्थ  गुरू आणि चंद्र  शुभ असुन घरासाठी उत्तम खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील मंगळ शुक्र तुमच्या ऊर्जेचा वापर करून घेतील. नाव मिळेल .दिवस शुभ. धनु तृतीय गुरू चंद्र आणि भाग्यात शुक्र मंगळ  शुभ संकेत देत आहेत. गुरुकृपा  होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख, वडिलांकडून लाभ, मौजमजेसाठी प्रवास असा हा दिवस शुभ फळ देईल. मकर आज द्वितीय स्थानातील गुरू चंद्र अतिशय शुभ फळ देणारे असुन आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र अष्टमात मंगळ शुक्र आहे हे विसरू नका. वाहन जपून चालवा. दिवस शुभ आहे. कुंभ राशीतील गुरू चंद्र सात्त्विक प्रवृत्ती वाढीस लागतील. गुरुकृपा राहील.आर्थिक लाभ होतील. नवीन काही सुरू करण्यास दिवस शुभ आहे.  आयुष्याचा जोडीदार  मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला. मीन धार्मिक,कौटुंबिक कारणांसाठी भटकंती खर्च ,खरेदी ,व्यय असा हा दिवस बिझी जाईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तृतीय स्थानातील राहू वारंवार फिरती  दाखवत आहे.दिवस मध्यम. शुभम  भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published: