मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /मेष, मकर आणि मीन राशींसाठी आजचा दिवस उत्तम; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

मेष, मकर आणि मीन राशींसाठी आजचा दिवस उत्तम; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

आज सूर्याचा राशी बदल होणार असून धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज सूर्याचा राशी बदल होणार असून धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज सूर्याचा राशी बदल होणार असून धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 16 डिसेंबर 2021.वार गुरुवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी. चंद्र आज दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी  वृषभ राशीत प्रवेश करेल. आज सूर्याचा राशी बदल होणार असून धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दुपारनंतर बदलणारे ग्रहमान  अनुकूल फळ देणार आहे. आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख आणि नातेवाईकांच्या भेटी असा हा दिवस आहे. भाग्य स्थानात प्रवेश करणारा रवि बुध आनंदाचे क्षण आणेल. दिवस शुभ.

वृषभ

राशीत प्रवेश करणारा चंद्र मानसिक ताण कमी करेल. अष्टमात सूर्याचा प्रवेश प्रकृती जपा असे सांगत आहे. प्रवास योग येतील.  गुरू कृपा आहे.जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दिवस मध्यम.

मिथुन

राशीच्या व्यय स्थानात चंद्र मानसिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे.योग्य निर्णय घ्या. सप्तम स्थानात सूर्याचा प्रवेश अनुकूल आहे. व्यवसाय वाढ होईल. दिवस मध्यम.

कर्क

आज चंद्र  दुपारनंतर लाभ स्थानात प्रवेश करणार आहे. तिथे असलेला राहू ग्रहण योग निर्माण करेल. मानसिक आंदोलने होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस बरा आहे.

सिंह

राशी स्वामी रवि पंचमात येणार आहे. उच्च शिक्षण, आध्यात्मिक प्रगती यासाठी शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. दशम स्थानात दुपार नंतर येणारा चंद्र कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. दिवस शुभ.

कन्या

दुपारनंतर  अनपेक्षित कलाटणी मिळेल. कालपासून जाणवणारा निरुत्साह संपून नवीन जोश येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. दिवस शुभ.

तुला

अष्टमात येणारा चंद्र दिवसाच्या शेवटी जरा त्रासदायक ठरेल. शारीरिक कष्ट, सर्दी, अंग दुखी आदी पासून त्रास होईल. मानसिक रान जाणवेल. शांत रहा. दिवस मध्यम जाईल.

वृश्चिक

दिवसाच्या शेवटी जोडीदाराला घेऊन बाहेर जाण्याची संधी मिळेल. जाणवत असलेली हुरहूर संपेल. आणि एक प्रकारची ऊर्जा वाटेल. प्रकृती ठीक राहील. दिवस चांगला.

धनु

राशीत प्रवेश करणारा सूर्य बुधाशी  सहयोग करेल. दुपार नंतर षष्ठ स्थानात चंद्र आरोग्याच्या बारीकसारीक तक्रारी निर्माण करेल. आर्थिक बाजु चांगली राहील  मात्र देणे घेणे टाळा. दिवस शांततेत घालवा.

मकर

राशीच्या पंचम स्थानात येणारा चंद्र कार्य प्रसंग,मेजवानी यात सहभाग घेईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. राशीतील शुक्र शनि मन प्रसन्न करतील. दिवस अनुकूल.

कुंभ

राशीतील गुरू चंद्राचा केंद्र योग होणार आहे. घरात आनंदी वातावरण राहील. व्यय शुक्र खर्चात वाढ करेल. सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. दिवस चांगला.

मीन

राशीच्या तृतीय स्थानात येणारा चंद्र  हा येत्या एक दोन दिवसात प्रवास योग आणेल. भेटी गाठी होतील. समारंभ किंवा पूजेत सहभाग घ्याल. दिवस शुभ आहे.

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya