दैनंदिन राशीभविष्य : रविवार म्हणून बाहेर पडताय; 'या' राशींच्या व्यक्तींनी सांभाळून करा प्रवास

Horoscope : तुमच्या राशीनुसार पाहा आजचा दिवस कसा असेल?

Horoscope : तुमच्या राशीनुसार पाहा आजचा दिवस कसा असेल?

  • Share this:
आज रविवार दिनांक 13 जून 2021. ज्येष्ठ शुद्ध तृतीया. आजचे बारा राशींचं भविष्य असं आहे. मेष आज दिवसभर चंद्र  मिथुन राशीत  भ्रमण करेल. बहिण भावाशी संवाद साधा. आर्थिक बाजू भक्कम  राहील. गुरू कृपा  राहील. दिवसभराची स्थिती अनुकूल आहे. वृषभ कुठून तरी अचानक  मिळणारा  पैसा  सगळ्यांना  हवासा वाटतो. तुम्ही आज नक्की तो मिळवाल. गुरूची कृपा  राहील. दिवस  उत्तम. मिथुन रात्रीपर्यंत  राशीत असलेल्या चंद्र शुक्राचे शुभ पडसाद  उमटतील. कठोर बोलणं टाळा. दिवस शांततेत  पार पडेल. कर्क संध्याकाळपर्यंत जरा धीर धरा. फारसं धाडस नको. प्रवास टाळा.  घरी शांततेत दिवस घालवणं योग्य  ठरेल. सिंह दिवस उत्तम असून आर्थिक चिंता नको. फक्त उधळपट्टी टाळा. घरात कोणाशी वाद करू नका. शत्रू  टिकणार नाही. वाहन सांभाळून चालवा. कन्या आज आराम करा, मानसिक थकवा  दूर होईल. अति विचार करू नका. संतती चिंता तुम्हाला सतत असते, त्याकडे थोडं दुर्लक्ष करा. दिवस चांगला. तुला भाग्यकारक दिवस . अष्टमात असलेले  ग्रह शारीरिक कष्ट देतात तिकडे सतत लक्ष असू द्या. बाकी आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस चांगला. वृश्चिक अष्टमात असलेले चंद्र, शुक्र. सतत काही काम करावी लागतील. प्रकृती जपा.अति दगदग टाळा. दिवस फारसा अनुकूल नाही. धनु आज दोघांनी जोडीनं बाहेर जाण्याचा दिवस आहे. मौजमजा करा. पण वाहन जपून चालवा. दिवस  शुभ आहे. मकर प्रकृतीच्या तक्रारी आता कमी होतील. मानसिक ताण, आर्थिक  जबाबदारी आटोक्यात राहिल. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. कुंभ पंचमात दिवसभर चंद्र भ्रमण आहे. मुलांसाठी त्यांच्या गरजेचं सामान खरेदी करावं लागेल. त्यांच्यावर खर्च होईल. शत्रूवर विजय मिळेल. मीन आज गृहसौख्य भरपूर मिळेल. पण जास्तीचं कामही करावं लागेल. दिवस उत्तम असून आनंदात घालवा. गुरू जप करत असावा. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published: