मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: भाऊबीज कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक; 'या' राशींसाठी दिवस असेल शुभ

राशीभविष्य: भाऊबीज कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक; 'या' राशींसाठी दिवस असेल शुभ

पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 6 November 2021 शनिवार. आज भाऊबीज. यम द्वितीया. आज बहिण भावाला ओवाळून त्याच्या  दीर्घ आयुष्याची कामना करते. आज चंद्राला  देखील ओवाळतात. आज चंद्र  दिवसभर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. तिथे तो केतू सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज दिवस फारसा अनुकूल नाही. मन अशांत राहील. आर्थिक बाजु ठीक आहे. धार्मिक समारंभ ,मेजवानी आयोजित कराल. पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती  जपा. दिवस मध्यम.

वृषभ

आज व्यवसाय उत्तम फळ देईल. मानसिक ताण  कमी होईल. घरात काही तरी  समारंभ होईल. जोडीदाराची साथ  मिळेल. दिवस चांगला आहे.

मिथुन

राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र  केतू भ्रमण प्रकृती कडे लक्ष असू द्या असे सुचवीत आहे. नातेवाईक भेटतील .नोकरीत काम जास्त पडेल. दिवस चांगला जाईल.

कर्क

मुलांना आणि घरच्या लोकांना वेळ द्या. शिक्षणात उत्तम प्रगती, वाचन लिखाण यात वेळ जाईल.  पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. आर्थिक घडामोडी होतील. दिवस बरा जाईल.

सिंह

शुक्र आणि चतुर्थ चंद्र घरांमधे भरपूर खर्च करवणार आहेत.  मंगळ बुध काही त्वचेचे विकार निर्माण करतील. घरात जास्तीचे काम पडेल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ.

कन्या

आज छोटेसे जवळपास चे प्रवास घडतील. महत्त्वाचा निर्णय, किंवा संभाषण होईल. भावंड भेट देतील. प्रकृती ठीक राहील. दिवस चांगला जाईल. भाऊबीज चांगली साजरी होईल.

तुला

राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल.  अनावश्यक धाडस करू नका. . कुटुंबात काही छान घटना घडेल.  दिवस शुभ.

वृश्चिक

राशीतील चंद्र  राहूच्या दृष्टीत आहे. मन थोडे अशांत राहील. संभ्रमात पडाल.घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. मेजवानी आयोजित कराल..धार्मिक कार्यासंबंधी शुभ दिवस.

धनु

व्यय स्थानातील चंद्र केतू भ्रमण वाढलेला खर्च, दगदग दाखवत आहे. गुरु  मात्र साथ देईल. वडील व्यक्तींची मदत होईल. प्रवास  घडतील. दिवस मध्यम जाईल.

मकर

राशीच्या लाभ स्थानातील चंद्र प्रवास योग,गाठीभेटी, आणि लाभ कारक आहे. अध्यात्मिक साधना होईल.  नातेवाईकांना भेट, मेजवानी  इत्यादीचा लाभ घ्याल. दिवस शुभ.

कुंभ

कामाच्या ठिकाणी आज जास्तीचे काम,विशेष जबाबदारी पडेल. आर्थिक बाजु ठीक राहील. प्रकृती ठीक राहील. जोडीदार मदत करतील. दिवस अनुकूल.

मीन

राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आज आध्यात्मिक अनुभव देईल. तुमचा प्रभाव वाढेल. घरातील शांतता जपा. काहींना प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope