Home /News /astrology /

राशीभविष्य: कन्या, मकर, मीन भाग्यकारक दिवस; 3 राशींनी मात्र जरा सांभाळा!

राशीभविष्य: कन्या, मकर, मीन भाग्यकारक दिवस; 3 राशींनी मात्र जरा सांभाळा!

आज बुधवार दिनांक 8 September 2021. भाद्रपद शुक्ल द्वितीया. काय आहे आज तुमच्या राशीत? वाचा

आज बुधवार दिनांक 8 September 2021. भाद्रपद शुक्ल द्वितीया.. आज चंद्र उत्तरा फाल्गुनी  नक्षत्रांतून भ्रमण करणार आहे. पाहू या आजचे राशी भविष्य. मेष आज दिवस कष्ट देणारा आहे. काही प्रमाणात मानसिक, शारीरिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी जास्तीची कामंं,  जास्तीचा आर्थिक ताण असा होतहा दिवस असून फार अपेक्षा करू नयेच. कोणाशी शत्रुत्व नको. दिवस मध्यम . वृषभ आज ईश्वर चरणी मन रमेल. मुलं मनासारखी वागतील. चंद्र राहू दृष्टी योग  मनाला हुरहूर लावणारा आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस बरा आहे. ऑफिस मध्ये काम करायला तयार रहा. दिवस  चांगला जाईल. मिथुन आज कामाला कंटाळून तुम्ही घरात राहणे पसंत कराल. एकूण काय तर आज घरकाम जास्त पडेल .काही खरेदीही होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल.. घरात शांतता भंग होऊ देऊ नका . दिवस चांगला आहे. कर्क राशीच्या तृतीय  स्थानातील मंगळ  आणि बुधामुळे प्रवास योग आहे. आज तृतीय चंद्र महत्त्वाचे फोन  नातेवाईकांच्या भेटीगाठी घडवून आणेल. कोणाशीही वाद करू नका. प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल. सिंह सूर्य प्रगतीचे मार्ग प्रशस्त करीत आहे. राहू दशमात कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणेल. आज चंद्र आर्थिक लाभ  मिळवून देण्यास सज्ज आहे. मंगळ  अजूनही आर्थिक नुकसान दाखवत आहे. दिवस नेहमी सारखाच पार पडेल. कन्या आज राशीतील चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून भागीदारी व जोडीदारासाठी शुभ फळ देईल. अकस्मात लाभ किंवा त्यासाठी संधी निर्माण होईल.परदेशी  जाण्याची  संधी मिळेल. आनंद देणारा दिवस आहे. तुला आज दिवस थोडा कष्ट देणारा ठरेल. चंद्र आर्थिक, शारीरिक हानी, दर्शवतो. गुरु कृपा असेल. चतुर्थातील शनि आईवडील  गृहसौख्य यासाठी त्रास देणारा आहे. राशीतील शुक्र शुभ. भाग्य साथ देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आज लाभ मिळवुन देणारा,मित्र मैत्रिणीशी गाठ घालून देणारा असा दिवस आहे. चतुर्थ गुरू, तृतीय शनि कुटुंबाकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल असे सुचवतो. संतती सुख चांगले मिळेल.  दिवस चांगला जाईल. धनु आज कार्यालयीन घडामोडी फार वाढतील. लाभातील शुक्र स्त्री वर्गाकडून लाभ दाखवत आहे.तुमचा प्रभाव वाढेल. कार्य सिद्धी होईल. साडेसातीचा प्रभाव हळूहळू कमी होईल. दिवस शुभ. मकर दोन दिवस कष्टाचे, अशांत गेले असतील. आज एका भाग्यकारक दिवसासाठी तयार रहा. आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या काही संधी येतील. मुलांची चिंता कमी होईल. दिवस शुभ असून यश मिळेल. कुंभ आज अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकेल. चंद्र गुरू षडाष्टक शुभ कार्यात अडथळे निर्माण करेल. संतती चिंता होईल. घरात थोडी अस्थिर आणि तणावपूर्ण स्थिती  होईल  जोडीदाराची काळजी घ्यावी. मध्यम दिवस. मीन आज छानसा दिवस असून पती पत्नी जोडीने काही खरेदी, मौजमजा करतील. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. सिंह राशीतील सूर्य  नवीन नोकरी साठी अनुकूल आहे. बोलणी करायला शुभ दिवस.. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या