मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: या 2 राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या; प्रकृती राहील नरम!

राशीभविष्य: या 2 राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या; प्रकृती राहील नरम!

आज दिनांक 29 जुलै 2021 गुरुवार. तिथी आषाढ कृष्ण षष्ठी. दोन राशींच्या व्यक्तींसाठी जपून राहण्याचा सल्ला ग्रहस्थिती देते आहे.

आज दिनांक 29 जुलै 2021 गुरुवार. तिथी आषाढ कृष्ण षष्ठी. दोन राशींच्या व्यक्तींसाठी जपून राहण्याचा सल्ला ग्रहस्थिती देते आहे.

आज दिनांक 29 जुलै 2021 गुरुवार. तिथी आषाढ कृष्ण षष्ठी. दोन राशींच्या व्यक्तींसाठी जपून राहण्याचा सल्ला ग्रहस्थिती देते आहे.

  आज दिनांक 29 जुलै 2021  गुरुवार. तिथी आषाढ कृष्ण षष्ठी. आज चंद्र  मीन राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  मेष

  व्ययस्थानातील चंद्र  आज दिवस अनुकूल नाही हे सांगतो आहे. मीन  चंद्र, मंगळ  अशुभ योगात असून  आर्थिक  बाबतीत  काळजी घ्यावी. प्रकृती  जरा  नरम राहील. दिवस मध्यम .

  वृषभ

  आज मित्र मैत्रिणींसोबत आनंदात दिवस घालवा. लाभ होतील. तुमच्या बुद्धी  व धैर्याने

  परिस्थितीत बदल होईल. नवीन परिचय  होतील.  आरोग्य ठीक राहील. दिवस  उत्तम  आहे.

  मिथुन

  आज एखादी महत्त्वाची मीटिंग होईल. त्यात  तुम्ही  सर्वांच्या  नजरेस याल. तुमचे काम  आणि  बुद्धी   सर्वाना माहिती  होईल. प्रभाव वाढेल. धनस्थानातील  सूर्य  पैसा देईल. प्रसन्न दिवस.

  कर्क

  महत्त्वाची बातमी, भाग्यकारक  घटना असा हा आनंदी दिवस आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस उत्तम  आहे. धनस्थानातील  मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र  कुटुंबातील स्त्री वर्गाकडून  लाभ  दर्शवतो. दिवस  उत्तम .

  सिंह

  आज अष्टमात चंद्र ,राशीतील मंगळ शुक्राचे भ्रमण सांभाळून रहा असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. व्यवसायधंद्यात  आज काही  बदल नको.  महत्त्वाचा निर्णय  टाळा. दिवस मध्यम.

  कन्या

  आज जरा बाहेर  फिरून येण्याचा  मूड होईल. दोघे मिळून काही  खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय  उत्तम  राहील. शुक्र खरेदी करता अनुकूल आहे.

  तुला

  षष्ठ चंद्र, आराम, मनोरंजन, नातेवाईकांना भेट किंवा  फोन असे दर्शवतो आहे.   देणे घेणे करू नका.  आर्थिक बाजु चांगली राहील. आरोग्य जपा. दिवस मध्यम आहे.

  वृश्चिक

  महत्त्वाचा पत्र व्यवहार, जन संपर्क होईल. संतती ला वेळ द्यावा लागेल. जरा प्रकृतीला  जपावे. मित्र मैत्रिणींसोबत दिवस आनंदात घालवा. आर्थिक  बाजु ठीक राहील. दिवस शुभ.

  धनु

  आज गृहसौख्य भरपूर लाभणार आहे. घरासाठी काही नवीन खरेदी  होईल. अष्टमात सूर्य प्रकृती थोडी नरम राहील. काळजी घ्या. घरीच आराम करावा असे वाटेल. दिवस बरा आहे.

  मकर

  तुम्ही आज जे काम हाती घ्याल त्यात यश  मिळेल. तृतीय चंद्र आज प्रवास, मौजमजेसाठी खर्च  असे दर्शवतो. बहीण भावंड भेट देतील. तुमचा दिवस उत्तम जाईल.

  कुंभ

  आज चा दिवस  आर्थिक भरभराट, कुटुंबाचे भक्कम  पाठबळ असा आहे. व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील तर दिवस शुभ. शत्रू  टिकाव धरणार  नाहीत  उत्तम  दिवस.

  मीन

  आज राशीतून होणारे  चंद्राचे भ्रमण आणि शुक्र मंगळ षडाष्टक  योग करीत आहे. आर्थिक घडामोडी होतील. कधीतरी स्वतःचा  विचार करणे  गरजेचे  असते. आज स्वतः साठी वेळ काढा. काही मित्र मैत्रिणींना भेटा.धार्मिक कार्य  होईल.

  शुभम भवतु !!

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya