Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: आज मनातील गोष्टी धडाधड बोलून मोकळे व्हा; कसा असेल 6 जूनचा दिवस? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: आज मनातील गोष्टी धडाधड बोलून मोकळे व्हा; कसा असेल 6 जूनचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) मनातील गोष्टी व्यक्त करण्याचा आणि मन स्वच्छ करण्याचा आजचा दिवस आहे. याआधी अशी संधी तुम्हाला मिळालेली नाही. आज मन मोकळं करा, कारण तुम्हाला योग्य रितीनं समजून घेतलं जाईल. एक नवी सुरुवात करा. LUCKY SIGN – A Tea Cup वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर फेरविचार करण्याचा तुमचा स्वभाव नाही, पण आता एखाद्या गोष्टीचा पुन्हा विचार करू शकाल. अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याची अचानक इच्छा होईल. तुम्ही मदत केलेली व्यक्ती आधीच्या मदतीची परतफेड करेल. LUCKY SIGN – A curtain मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत कराल; पण त्याला सहजासहजी मान्यता मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी हळूहळू पण सकारात्मक गोष्टी घडतील अगदीच काही नसण्यापेक्षा हे बरं. कुणीतरी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहील. LUCKY SIGN – An old classic कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी तुमची हुशारी उपयोगी पडेल. तुमचा विस्तारलेला दृष्टिकोन आणि त्यातील सुधारणा समोरच्यांना लक्षात येतील. सध्या उत्तम व्यायाम करण्याची गरज आहे. LUCKY SIGN – A glass jar सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही केलेल्या भूतकाळातील काही चुकांचे परिणाम भोगावे लागतील, पण आता जुन्या गोष्टींसाठी माफ करून त्या विसरण्याची वेळ आली आहे. जुन्या मित्राकडून एखादं सुखद सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या द्विधेनं तुमचं मन व्यापलं होतं, त्याबाबत स्पष्टता येईल. LUCKY SIGN – A peacock feather कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) अचानक पाहुणे येतील आणि तो बदल तुम्हाला आवडेल. अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी तुम्ही तुमची जुनी आवड किंवा छंद जोपासाल. नवीन डाएट आणि व्यायामाच्या रूटिनमुळे तुम्ही खूप सतर्क राहताय. LUCKY SIGN – A red drink तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एकसुरी झालेल्या आयुष्यात नवीन रस्ता सापडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक व्हायची शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेल्या छोट्या सहलीला जाल. बऱ्याच काळापासून भेटण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत तुम्हाला अधिक वेळ घालवता येईल. LUCKY SIGN – A locked door वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) भूतकाळातील काही घटना अचानक डोळ्यांसमोर तरळतील आणि आशेचा एक किरण देऊन जातील. ऑफिसात काही नवीन घडामोडी घडत नसल्यानं तुम्हाला उत्साही वाटणार नाही. तुमचा जवळचा मित्र तुमची भेट होत नसलेल्यान निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी दुसऱ्या कोणाला सोबत घेईल, त्यामुळे तुमचं मन दुखावेल. LUCKY SIGN – Blue tourmaline धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) बऱ्याच कालावधीनंतर स्वतःला चांगला वेळ दिल्याचं समाधान मिळेल. तुम्हाला अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे; पण तुम्हाला सतत शोधत राहिलं पाहिजे. जोडीदारावर काही आर्थिक ताण असण्याची शक्यता आहे, लक्ष द्या. LUCKY SIGN – An onyx मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखादा पेच सोडवणं किंवा विसरणं शक्य नसेल, तर सध्यातरी तो विचार सोडून द्या. नवीन व्यक्तींच्या चांगल्या वागण्यामुळे तुमचं स्वतःबद्दलचं मत आणखी चांगलं होईल. दीर्घ काळानंतर मानसिक संघर्ष संपुष्टात येईल. LUCKY SIGN – A rosary कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) अनेक व्यवहारी निर्णय घेतल्याने मन अस्थिर होईल. कदाचित तुम्ही भूतकाळातल्या काही गोष्टींमध्ये अडकून पडाल. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात भेटलेली एखादी व्यक्ती तुमचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल. LUCKY SIGN – A designer watch मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) इतरांनी तुम्हाला महत्त्व द्यावं किंवा तुमच्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर तुम्हाला तुमचं वागणंही पडताळून पहायला हवं. सहजच गुंतवणुकीची एखादी चांगली संधी चालून येण्याची शक्यता आहे. प्रयत्न करून पाहा. तुम्हाला काही मदत हवी असेल, तर शेजारी अचानक उपयोगी पडू शकतात. LUCKY SIGN – A rabbit pet
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या