• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: वृषभ, कन्या मकर राशीला आजचा दिवस चांगला

राशीभविष्य: वृषभ, कन्या मकर राशीला आजचा दिवस चांगला

दैनंदिन राशीभविष्याबरोबर दररोज आपण एकेका राशीचे स्वभाव गुण-दोष जाणून घेत आहोत. आज आहे धनु राशीचा नंबर. पाहा तुमच्या राशीचं भविष्य..

  • Share this:
आज बुधवार  दिनांक 23 जून 2021.तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,चतुर्दशी. आज धनु राशी  (Sagittarius) बद्दल थोडे जाणून घेऊ या. धनु राशी चक्रातील ही  नववी रास. द्विस्वभाव अग्नी तत्त्वाची  असून मानव आणि अश्व  असे चिन्ह आहे. हातात धनुष्य आहे. तीव्र स्वभाव. राशीचा अंमल  मांड्यावर असतो . परिवर्तनशील ,धार्मिक  व्यक्ती असतात. विशेष मोठे नाक, जबडा, गोल चेहरा असतो. दुहेरी व्यक्तिमत्त्व असते. कधी अत्यंत शालीन तर कधी  रागीट .गुरु ग्रहाचे स्वामित्व असलेली ही  रास विचारी असते. ओम ब्रीम.बृहस्पतये नम: हा जप  व गुरू  उपासना करावी. आता जाणून घ्या (Today's Horoscope) आजचं 12 राशींचं भविष्य मेष आज दिवस साधारण आहे. फार कष्ट टाळा. मन थोडे  नाराज राहील. शरीर कष्ट होतील.शुक्र राशीच्या चतुर्थ स्थानात  प्रवेश करीत आहे. तिथे तो मंगळा सोबत  असेल.नवीन खरेदी होईल. घरातील वातावरण सांभाळा.दिवस मध्यम . वृषभ आज दिवस चांगला आहे. आपली मूळ प्रवृत्ती आनंदी रसिक  आहे. त्यामुळे आता प्रवासाचे वेध लागतील. मौजमजेसाठी वेळ काढावा अशी इच्छा होईल. कार्य क्षेत्रातही नवीन संधी  मिळतील. दिवस शुभ. मिथुन प्रकृती  सांभाळा. धनस्थानातील मंगळ शुक्र अणि व्यय स्थानातील राहू बुध आर्थिक  व्यवहार  सांभाळून करा  असे सुचवीत आहेत. अति खर्च टाळावा. शत्रू पिडा संभवते. दिवस  मध्यम आहे . कर्क आज राशीत आलेल्या मंगळ शुक्राचे वास्तव्य मनाची तगमग कमी करेल. मन आनंदी राहील. मुले मनासारखी वागतील. अष्टमात गुरु वक्री आहे. जपून रहा. पोटाचे  दुखणे  असेल तर काळजी घ्या. दिवस चांगला आहे. सिंह आज घर काम करून थकायला होणार  आहे. आर्थिक  गणित  बिघडू देऊ नका. गुरु महाराज  जोडीदाराची साथ उत्तम देतील.खर्च अति वाढण्याची  शक्यता  आहे. दिवस बरा आहे. कन्या आज तृतीय चंद्र तुम्हाला  आनंदी ठेवेल. मित्र मैत्रिणींना भेटण्याची संधी, भावंडाची उत्तम साथ मिळेल. जनसंपर्क, एखादी छोटीशी पार्टी  होईल. काळजी करू नका. दिवस उत्तम. तुला राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आज धनलाभ दाखवीत आहे. दशमातील शुक्राचे भ्रमण कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देण्यास सज्ज आहे. फक्त  अष्टमात बुध राहू प्रकृती  जपा  असाही संकेत देत आहेत. दिवस शुभ. वृश्चिक चंद्र आज तुमच्या राशीतून भ्रमण करणार असुन सूर्य मिथुन राशीत अष्टमात आहे. काही  अडथळे तर येणारच. पण भाग्यात आलेला  शुक्र उत्तम फळ देईल. पूजा पाठ, समारंभ यात मन रमेल. दिवस चांगला आहे. धनु व्ययस्थानातील चंद्र भ्रमण मन अशांत  ठेवेल. अष्टमात मंगळ शुक्राचे भ्रमण काही प्रकृती संबंधी  समस्या निर्माण करेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबीय साथ देतील. मध्यम दिवस. मकर लाभदायक दिवस. मुलांसह, आनंदी दिवस घालवा. काम थोडी सावकाश होतील. जोडीदाराला नवीन खरेदी  करावी असे वाटेल. अविवाहित व्यक्तींना  एखादी छान व्यक्ती भेटेल. उत्तम दिवस. कुंभ आज फक्त कामाचा विचार  कराल. जबाबदारी वाढेल. वक्री शनि जपुन असावे  असे सांगतो. मधुमेह, रक्तदाब असणार्‍या कुंभ व्यक्तीनी जपुन रहावे.  राशीतील गुरू साथ देईल. दिवस  मध्यम . मीन भाग्य कारक दिवस. दोन दिवस तुम्ही अस्वस्थ होतात, आज मात्र  मन शांत होईल. प्रकृती उत्तम राहील. वाहने जपून चालवा .भावंड भेट देतील. मुलां संबंधी  काही  चांगली  घटना  घडेल. दिवस शुभ. शुभम भवतु!!
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published: