मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांना त्रस्त करेल शनीची साडेसाती; हे उपाय लक्षात ठेवा

हिंदू नववर्षात या राशीच्या लोकांना त्रस्त करेल शनीची साडेसाती; हे उपाय लक्षात ठेवा

कोणत्या राशींना शनीची साडेसाती

कोणत्या राशींना शनीची साडेसाती

Rashifal 2023: कुंभ राशीचा स्वामी शनि मार्च 2025 पर्यंत आपल्या स्वराशीत राहील. यामुळे 3 राशींवर साडेसातीचा प्रभाव राहील आणि 2 राशींवर शनीच्या ढय्यैचा प्रभाव राहील. त्या राशी कोणत्या आणि त्यांनी काय खबरदारी घ्यावी याविषयी जाणून घेऊ.

पुढे वाचा ...
  • Local18
  • Last Updated :
  • Patna, India

पाटणा, 26 मार्च : शनिची साडेसाती, अडीचकी इत्यांदी शनिदोष सुरू असल्याचे ऐकताच अनेकांना भीती वाटू लागते. याविषयी पंडित नवीन पांडे सांगतात की, शनिदेव व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात, शनिदेवाच्या साडेसाती आणि इतर शनिदोषांमध्ये लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळणं इतकं सोपं काम नाही. पंडित नवीन पांडे यांच्या मते, सध्या शनि हा कुंभ राशीत मूळ त्रिकोण राशीत भ्रमण करेल.

कुंभ राशीचा स्वामी शनि मार्च 2025 पर्यंत आपल्या स्वराशीत राहील. यामुळे 3 राशींवर साडेसातीचा प्रभाव राहील आणि 2 राशींवर शनीच्या ढय्यैचा प्रभाव राहील. तसेच शास्त्रानुसार, ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं आणि शारीरिक आणि आर्थिक समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

या राशींवर परिणाम होईल -

पंडित नवीन पांडे यांनी सांगितले की, हिंदू नववर्षाच्या सुरुवातीसह मीन, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव पडेल. दुसरीकडे, कर्क आणि वृश्चिक राशीच्या राशीच्या लोकांना धैय्याचा फटका बसेल. नवीन पांडे पुढे सांगतात की, शनीची साडेसाती आणि धैय्या टाळण्याचे अनेक मार्ग आहेत. ते पुढे म्हणतात की, नवरात्रीत स्नान केल्यानंतर शुद्ध मनाने दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केल्यास शनीचा प्रभाव कमी होतो.

शनिदोषांचा त्रास असा टाळा -

पंडित नवीन पांडे सांगतात की, ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला न्यायाधीश मानले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. शनीच्या अशुभ प्रभावापासून स्वतःला वाचवण्यासाठी, संबंधितांनी शनिवारी मधल्या बोटावर काळ्या घोड्याची प्रतिकात्मक नाल घालू शकतात. याशिवाय तांब्याच्या भांड्यातून तीळ आणि गुळाचे पाणी सकाळी पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने शनीचा प्रभाव कमी होतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदोषाचे पठण, तिळाचे दान आणि सुंदरकांडाचे नियमित पठणही करता येते. मात्र, पंडित नवीन पांडे सांगतात की, खूप त्रास होत असेल, तर भाताची पेज पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ केल्यानेही शनिदेवाला शांती मिळते.

हे वाचा - चैत्र नवरात्रीत स्वप्नात अशा गोष्टी दिसणं भाग्यशाली! देवीची कृपा असण्याचे संकेत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Religion, Vastu