मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: आठवड्याचा पहिला दिवस या राशीसाठी असेल धमाकेदार; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: आठवड्याचा पहिला दिवस या राशीसाठी असेल धमाकेदार; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखादं छोटंसं सेलिब्रेशन लवकरच घडू शकतं. एखाद्या नात्याची गरज संपल्यामुळे त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी व नवीन नातं जोडण्यासाठी ग्रहांचं उत्तम पाठबळ लाभेल. फोनवर बोलताना काही खटके उडाल्यास शांत राहा. आत्मचिंतन करा. LUCKY SIGN – A mannequin वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्हाला भूतकाळात उगाचंच बराच त्रास सहन करावा लागला आहे, पण आता त्यापासून थोडी सुटका होणार आहे. गतकाळातील काही प्रथा-परंपरांमुळे सक्षम होण्यापेक्षा अधिक बंधनात अडकल्यासारखं वाटेल. LUCKY SIGN – A role model मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल झाल्यामुळे येत्या संपूर्ण आठवड्याच्या नियोजनात बदल होईल. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, अशी शक्यता आहे. तिथे एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाशी ओळख होईल. या ओळखीचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. LUCKY SIGN – A silver string कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी नवी गोष्ट सुरू करताना तुम्हाला थोडी निराशा जाणवेल, पण चिंता करू नका, सगळ्या शक्ती तुमच्यासोबतच आहेत. एखादा ठोस निर्णय घेण्याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल, तर ही संधी वाया जाण्यापूर्वी तुमच्या मनाला आवर घालून योग्य तो निर्णय घ्या. LUCKY SIGN – A rose plant सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजचा दिवस प्रयत्न करून स्वत: च्या अटींवर गोष्टी तडीस नेण्याचा आहे. क्वचितप्रसंगी तुम्ही इतरांना मागे टाकून प्रगती करताय असं वाटेल, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त आत्मविश्वास असल्यासारखं वाटेल. आज जे काम पूर्ण कराल, त्याचं लवकरच चांगलं फळ मिळेल. LUCKY SIGN – A sunrise कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दिवसाची सुरुवात संथ होईल, मात्र उत्तरार्धात कामांना गती मिळेल. कामाचा ताण जाणवेल. तो हाताळण्यासाठी स्वतःला थोडा वेळ आणि स्पेस द्या. एखाद्या मित्रामुळे तुमची संध्याकाळ मजामस्तीत जाऊ शकते. LUCKY SIGN – A building तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) गेल्या काही वर्षांत तुम्ही अधिक प्रगल्भ झाला आहात आणि आता एखादी परिस्थिती समजून घेऊन त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता तुमच्यात आली आहे. तुमच्याकडून आणखी उत्तम गोष्टींची अपेक्षा आहे आणि तसं करणं तुमच्याच हातात आहे. तुमच्यावर बऱ्याचअंशी अवलंबून असणारी जवळची व्यक्ती एखाद्या अडचणीत असू शकते. LUCKY SIGN – A red wallet वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही ज्या व्यक्तीशी बांधील आहात, ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करत आहे, पण परस्परांना पुरेसा वेळ न देऊ शकल्यामुळे तुम्हादोघांची चिडचिड होऊ शकते. तुम्ही सार्वजनिक व्यवहारात क्षेत्रांत काम करत असाल, तर तुम्ही एखादी आणखी चांगली संधी शोधा. LUCKY SIGN – An emerald धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) धमाकेदार संधींचा आजचा सुंदर दिवस असेल. आत्ता त्या दृष्टिपथात नसतीलही, पण त्या मजेदार असतील. भिजत पडलेले निर्णय लवकर निकाली काढा. मेसेज किंवा कॉलच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींशी संपर्कात राहणं ही चांगली कल्पना आहे. LUCKY SIGN – A golden embroidery मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कोणत्याही विशेष गोष्टीवर लक्ष केंद्रीत न करता नेहमीसारखा सामान्य दिवस घालवण्यासाठी आज चांगली ऊर्जा मिळेल. खरेदीचा आनंद घेऊन तुम्ही आजचा दिवस घालवू शकता. अनपेक्षितपणे एखादा मित्र येऊन तुमचं मनोबल वाढवेल. पोटशूळाची समस्या चिंतेचं कारण बनू शकेल. LUCKY SIGN – A salt water lake कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) कुणाचीतरी प्रकर्षानं आठवण येईल त्यामुळे तुमचं भानच हरपेल. पण तुम्हाला वास्तवाचं भान ठेवून त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एखादी छान संधी येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A colorful bag मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही भावना व्यक्त केल्या, तर तुमचं मन दुखावलं जाईल अशी भीती तुम्हाला वाटते आहे, पण तुम्ही व्यक्त झाला नाहीत तर तुमचीच डोकेदुखी वाढणार आहे. तुम्ही केवळ तुमच्या चांगल्यासाठी प्रयत्न करा. तुमची सिक्रेट्स माहीत असलेल्या एखाद्या जवळच्या मित्रावर तुम्ही यासाठी विसंबून राहू शकता. LUCKY SIGN – A river
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या