Home /News /astrology /

राशीभविष्य: वृश्चिक, वृषभ आणि मिथुन राशींसाठी आजचा दिवस उत्तम; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

राशीभविष्य: वृश्चिक, वृषभ आणि मिथुन राशींसाठी आजचा दिवस उत्तम; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    मुंबई, 13 डिसेंबर:  आज सोमवार दिनांक 13 december 2021.वार सोमवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल दशमी. चंद्र आज मीन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या व्यय स्थानात चंद्र मानसिक ताण दर्शवतो. घरी आरामात रहा. दगदग टाळा. भाग्यात आलेला सुर्य बुध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात  सहभाग  दर्शवतो. दिवस मध्यम . वृषभ लाभ स्थानात चंद्राचे भ्रमण शुभ असून मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. संतती साठी चांगला काळ आहे. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. दिवस शुभ. मिथुन राशीच्या दशमातील चंद्र भ्रमण कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. काही बदल संभवतात. दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानात भ्रमण करणारा चंद्र अतिशय शुभ असुन धार्मिक आस्था वाढीस लागेल. प्रवास योग आहेत. आनंदात दिवस जाईल. शत्रू पराजित होतील. सिंह अष्टमात चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य कमी करेल. काही शारीरिक त्रास संभवतात. मुलांसाठी काही नवीन संधी मिळवुन देईल. शैक्षणिक यश, अभ्यास इत्यादी साठी काळ शुभ आहे. कन्या चतुर्थ स्थानात सुर्य भ्रमण घरासाठी काही नवीन खरेदी, दुरुस्ती, सजावट  यासाठी उत्तम आहे. चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून जोडीने खरेदी होईल. दिवस शुभ. तुला आज प्रकृती जरा नरम गरम राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. मात्र खर्च फार होतील. नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा काळ. दिवस शुभ. वृश्चिक आज चंद्र पंचमात असून शैक्षणिक दृष्ट्या चांगला काळ आहे. नोकरी पेशा व्यक्तींना प्रमोशन, बदली असे सुचवत आहे . कोणाशीही वाद करू नका. दिवस शुभ. धनु राशीतील सूर्य बुध आणि धन स्थानातील शुक्र आर्थिक, सामाजिक पातळीवर यश मिळवून देईल. घरात अनेक घडामोडी होतील  भरपूर काम मिळेल. दिवस शुभ. मकर राशीतील शुक्र शनि  आणि तृतीय चंद्र प्रवास योग, बहिण भावंडांची भेट असा हा दिवस शुभ संकेत देत आहे.मात्र सुर्य कायदा पाळा असे सुचवत आहे.दिवस चांगला. कुंभ आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. राशीतील गुरू सहकार्य करणार आहे. मानसिक स्थैर्य लाभेल. कुटुंबा सोबत दिवस आनंदाने व्यतीत होईल. मीन या राशीच्या व्यक्ती साठी आजचा दिवस अनुकूल असून अनेक घडामोडी घडतील. जबाबदारी येईल. घरात काही जास्तीचे काम निघेल. शुभ कार्य घडतील. दिवस चांगला. शुभम  भवतु!!
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या