• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मिथुन, वृश्चिक राशींसाठी आजचा दिवस ठरणार लाभदायक; 'या' राशींसाठी मध्यम दिवस

राशीभविष्य: मिथुन, वृश्चिक राशींसाठी आजचा दिवस ठरणार लाभदायक; 'या' राशींसाठी मध्यम दिवस

जाणून घेऊया आजच्या दिवसाचं बाराही राशींचं राशीभविष्य.

  • Share this:
आज  सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021.आज त्रयोदशी श्राद्ध. चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. तर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं बाराही राशींचं राशीभविष्य. मेष आज ही दिवस अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरकाम आणि मुल देखील आज तुमचा वेळ घेणार आहेत. दिवस चांगला आहे. वृषभ आज दिवस तुम्हाला कामाला लावणार असे दिसते. पण काळजी नको, तुम्ही उत्साहाने  घराची सजावट कराल. ऑफिस मध्ये  जास्तीचे काम पडेल. कुटुंबाचा पाठींबा मिळेल. दिवस उत्तम. मिथुन तृतीय चंद्र प्रवास योग आणेल. भावंडांची मदत कराल. तुमचे संभाषण चातुर्य वाढेल. अनेक लोक भेटतील. आनंदी दिवस. कर्क सप्तम  गुरू आणि तृतीय स्थानातील  मंगळ  निश्चित पणे उलाढाल वाढवतील. भावा कडुन फायदा होईल. तुमच्या मनाचा कल पाहून निर्णय घ्या. मंगळ सूर्य परदेशी संबंधी बोलणी सुरू करेल. दिवस चांगला. सिंह चंद्र गुरूच्या  षष्ठात असून तुमचे  व्यक्तिमत्त्व सर्वाना आकर्षित करेल. आर्थिक बळ राहील. काही चांगली प्रपोजल येऊ शकतात. गुरुची उपासना करावी.  दिवस उत्तम  आहे. कन्या आज व्यय स्थानातील चंद्र तुम्हाला थकवून टाकणार आहे. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम  आहे. तुला आज आपण आपण उत्कृष्ट ग्रहस्थितीचा  लाभ घ्यावा असे ग्रह सांगत आहे. चतुर्थ गुरू शनि घरा संबंधी आनंदाची बातमी देऊ करील. चंद्र गुरु षडाष्टक आहे.ऑफिस मध्ये खूप काम  पडेल. पण त्याचा फायदा होईल. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमचा दिवस  काही महत्त्वाचा मीटिंग्स, नवीन लोकाना भेटणे, मोठे निर्णय किंवा उशिरा पर्यन्त कामात जाणार आहे. कोणालाही लागेल असं बोलू नका. दिवस उत्तम. धनु काही  धार्मिक कार्य घडेल किंवा प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून  बाहेर याल.त्यामुळे तुमचे  नाव होईल. वाहन जपून चालवा. मकर आज राशीच्या अष्टमात चंद्र भ्रमण असून मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. प्रकृती  कडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी. दिवस मध्यम आहे. कुंभ चंद्र सप्तमात असून जोडीदाराला उत्तम फळ देणारा आहे  संतती सुख मिळेल. आनंदाची वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल .दिवस  शुभ. मीन आज चंद्र षष्ठ स्थानात असून मातुल घराण्यातील व्यक्ती भेटतील. आईला वेळ द्या .संतती चिंता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा आहे . शुभम भवतु!!
Published by:Atharva Mahankal
First published: