Home /News /astrology /

मीन राशीत आज त्रिग्रही योग; काय होणार परिणाम? पाहा आजचं राशिभविष्य

मीन राशीत आज त्रिग्रही योग; काय होणार परिणाम? पाहा आजचं राशिभविष्य

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Horoscope 28 April 2022 : आज मीन राशीत गुरू, शुक्र, चंद्र त्रिग्रही योग होणार आहे. त्याचा काय परिणाम होणार पाहा.

आज दिनांक 28 एप्रिल 2022. वार गुरुवार. चैत्र कृष्ण त्रयोदशी. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. आज मीन राशीत गुरू शुक्र चंद्र त्रिग्रही योग होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज व्यय चंद्र गुरू योग आहे चिंता कमी होईल. दशम शनी कामात लाभ मिळवून देईल. तसंच कार्यक्षेत्रात संधी मिळवून देईल. तुमचं नाव सगळीकडे होईल. दिवस उत्तम. वृषभ आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र लाभ स्थानात उत्तम आहे. दिवस शुभ. मिथुन खर्च, अडचणी, मानसिक ताण असा हा दिवस आहे. कामात काही अडचणी येतील. आर्थिक लाभ घडतील. दिवस मध्यम. कर्क आज राशीच्या भाग्यस्थानातील चंद्र गुरू शुभ घटनांची सुरूवात होईल असं सुचवत आहे. मन शांत राहिल. आर्थिकदृष्टया दिवस उत्तम जाईल. सिंह शनी सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जपून राहण्याचा काळ आहे. अष्टम चंद्र आज खर्च करील. दिवस चांगला आहे. कन्या मानसन्मान, समाजात नावलौकिक असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. दिवस चांगला आहे . तूळ आज दिवस क्षणोक्षणी पाऊल जपून टाका असं सांगत आहे. घरातील दुखणी. खर्च आता कमी होतील. चंद्र ऑफिसमध्ये भरपूर काम देईल. दिवस मध्यम. वृश्चिक भावंडांमध्ये मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंधसुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. संततीसाठी दिवस बरा. धनु शुक्र मंगळ स्वभाव उग्र करतील. चंद्र आर्थिक अडचणी निवारण करेल. कुटुंब सुख मिळेल. घरात काम भरपूर करावं लागेल. दिवस मध्यम. मकर शनी सध्या तुमच्या राशीत आहे. तृतीय चंद्र भावंडांची चिंता दूर करेल. स्वभाव काहीसा उग्र होईल. शांत रहा. लवकरच बदल होईल. दिवस बरा. कुंभ आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणेसुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. चंद्र गुरू बल देईल. दिवस चांगला आहे. मीन छोटे मोठे प्रवास, नातेवाईकांशी संपर्क असा हा दिवस आनंदात पार पडेल. गुरू चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. दिवस उत्तम. शुभम भवतू !!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या