आज गुरुवार दिनांक 30 September 2021 तिथी अविधवा नवमी. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
व्यवसाय वाढीस लागेल. महत्त्वाचा फोन येऊन चर्चा होईल. कौटुंबिक सुख लाभेल. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील. हितशत्रू त्रास देतील. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस उत्तम आहे.
वृषभ
संतती संबंधी महत्त्वाचा आठवडा आहे. काही तरी योग्य निर्णय होईल.भावंडांची प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतात. गुरु कृपा कामात मदत करेल. दिवस चांगला जाईल.
मिथुन
राशीतील चंद्र गुरूशी षडाष्टक योग करीत आहे. दिवस शुभ व आनंदी आहे. थोडा खर्च होईल. पण कुटुंब त्यामुळे खुश राहील. अष्टम शनि फक्त जपून राहण्याचा संकेत देतो आहे. दिवस शुभ
कर्क
आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शुक्र आता पुढच्या राशीत जाण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचा निर्णय सरकारी कामे उरकून घ्या. दिवस मध्यम जाईल .
सिंह
आज दिवस झपाट्याने कामे मार्गी लावण्यास मदत करेल. राशीच्या धनस्थानातील मंगळ ऊर्जा आणि तेज निर्माण करेल. जे चांगल्या कामासाठी वापरले तर फायदा होईल. प्रभावशाली दिवस.
कन्या
दशमातील चंद्र आज कार्य क्षेत्रात काही महत्त्वाचा बदल घडवून आणेल. रखडलेले काम ताबडतोब मार्गी लागेल. घरातले सगळे मदत करतील. प्रकृती जपा. दिवस शुभ आहे.
तुला
आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती दाखवत आहे. काही प्रवास, भेटी आणि
धार्मिक कार्य संभवतात. थोडी दगदग होईल. पण दिवस चांगला जाईल.
वृश्चिक
शारीरिक दुखणी विशेष करून अंग दुखी त्रास देईल. मन थोडे उद्विग्न राहील. पण शांत रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. . दिवस मध्यम आहे.
धनु
आज काहींना मौजमजेसाठी वेळ काढावा असे वाटेल. जोडीदार मदत करेल. त्यांच्या सोबत वेळ घालवा. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दिवस शुभ.
मकर
आज नवीन लोक भेटतील. बौद्धिक पातळीवर तुम्ही चमकून जाल. वाहन अगदी जपून चालवा. दशम शुक्र उत्तम संधी मिळवून देईल. जोडीदाराचा योग्य सल्ला ऐका. दिवस चांगला जाईल.
कुंभ
आज संतती सुख भरपूर लाभेल. मुलं मनासारखी वागतील. शत्रू तुम्हाला घाबरून राहतील. मंगळाचा जप करावा. जोडीदाराला जपावे. वाद नको. दिवस शुभ.
मीन
आज तुम्हाला दिवस निवांत आणि फार दगदग ना करता घालवायचा आहे. कारण घरात जास्तीचे काम पडेल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. संतती चिंता कमी होईल. दिवस मध्यम जाईल.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.