मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: 2 राशींनी आज बोलण्यातला तिखटपणा आवरावा

राशीभविष्य: 2 राशींनी आज बोलण्यातला तिखटपणा आवरावा

आज दिनांक 9 September 2021 गुरुवार. हरितालिका तृतीया. चंद्र आज हस्त नक्षत्रात असून दुपारनंतर चित्रा नक्षत्रात असेल. याचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम वाचा..

आज दिनांक 9 September 2021 गुरुवार. हरितालिका तृतीया. चंद्र आज हस्त नक्षत्रात असून दुपारनंतर चित्रा नक्षत्रात असेल. याचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम वाचा..

आज दिनांक 9 September 2021 गुरुवार. हरितालिका तृतीया. चंद्र आज हस्त नक्षत्रात असून दुपारनंतर चित्रा नक्षत्रात असेल. याचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम वाचा..

आज दिनांक 9 September 2021 गुरुवार.चंद्र आज हस्त नक्षत्रात असून दुपारनंतर चित्रा नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या पंचमात असलेला सूर्य  संतती बद्दल शुभ घटना घडवून आणेल. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामे आता पटापट होतील. ऑफिस मध्ये  तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दुपारनंतर दिवस अनुकूलता वाढवणारा आहे.

वृषभ

चतुर्थ स्थानात असलेला  रवि स्थावर संपत्तीत वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. मंगळ बुध युती बोलण्यात तिखटपणा आणेल. पण कोणाला दुखावून चालणार नाही. विशेष म्हणजे संततीला  दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन

चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा मंगळ हा राजकीय कामांसाठी उत्तम . सरकारी नोकरी असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील.  शनीची उपासना करा. दुपारनंतर दिवस  अनुकूल आहे.

कर्क

राशीच्या धन स्थानात  असलेला सूर्य तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळवून देईल. किंवा सरकारी कामे होतील. वकील, कलाकार यांना  संधी निर्माण होईल.  वडिलांना  फारसा अनुकूल नाही. मतभेद संभवतात. दुपारनंतर  जरा आराम करा .

सिंह

धन  स्थानात येणारा मंगळ तीव्र परिणाम देईल.  सरकारी कायदे, टॅक्स वगैरे अगदी कटाक्षाने पाळा. आरोग्य संभाळावे  लागेल. पैतृक संपत्ती संबंधी काही अडचणी येतील. दुपारनंतर दिवस शुभ आहे.

कन्या

व्यय स्थानात सूर्य आणि राशीत असलेला मंगळ  यांचे  काही अचानक परिणाम होतील. मित्रांशी बोलाचाली, मुलांशी वाद होतील. दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील.

तुला

राशीत नुकताच आलेला स्वगृही शुक्र प्रगतीचे नवीन दालन उघडेल. पुढील महिना तुमच्या करिअर साठी सर्वोत्तम आहे. मुलाखत यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. पण व्यय स्थानात मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो. उशीरा राशीत येणारा चंद्र  मौजमजेसाठी अनुकूल आहे.

वृश्चिक

दशमातील  रवि अचानक नवीन संधी घेऊन येईल. वडिलोपार्जित संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ. दुपारनंतर मानसिक ताण जाणवत असेल तर  घरी  आराम करा.

धनु

दशमातील  मंगळाची बुधासोबत होणारी युती आज  नोकरीसाठी उपयोगी सिद्ध होऊ शकते. आईवडिलांना  जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. पण सर्व व्यवहार  जपून व कायद्याच्या चौकटीत राहून करा. दुपारनंतर दिवस चांगला जाईल. .

मकर

राशीतील शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय असणार्‍यांना सरकारी मदत मिळेल. दुपारनंतर अचानक कामाचा ताण वाढेल. शनी जप, दान करावे.

कुंभ

सातव्या स्थानात रवि सरकारी कामांसाठी शुभ आहे  .अडचणी येतील पण काम होईल. अष्टमात मंगळ प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष द्यावे. शत्रू पिडा वाढेल  पण जिंकणार तुम्हीच. प्रवास जपून करा. दुपारनंतर दिवस शुभ. शनीची उपासना करावी.

मीन

मंगळ बुध जोडीदाराला  शुभ नाही. प्रकृती ,पोटाचे त्रास, किंवा काही कायदेशीर बाबी समोर येतील. तुमच्या साठी  धार्मिक वाचन, काही नवीन शिकण्यास अनुकूल वेळ आहे.अष्टमात शुक्र काही धनलाभ मिळवून देईल. दुपारनंतर दिवस कंटाळवाणा होईल .

शुभम भवतु !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya