मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: 6 राशींसाठी आजचा दिवस आहे शुभ; तुमची रास कुठली आणि कशापासून जपायचं?

राशीभविष्य: 6 राशींसाठी आजचा दिवस आहे शुभ; तुमची रास कुठली आणि कशापासून जपायचं?

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आज मंगळवार 9 नोव्हेंबर 2021 .आज कार्तिक शुक्ल पंचमी. 6 राशींसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या राशीत काय आहे वाचा..

  आज  मंगळवार 9 नोव्हेंबर  2021 .आज  कार्तिक शुक्ल पंचमी. आजचे बारा राशींचे राशी भविष्य बघूया. आज चंद्र धनु राशीत असेल. तिथे तो शुक्रा बरोबर युती करेल.

  मेष

  आज ईश्वरी कृपा होण्यासाठी उत्तम दिवस आहे. भाग्य स्थानातील चंद्र आध्यात्मिक उन्नती साठी मदत करेल.  मंगळ बुध रवि सप्तमात असून  हातून भरघोस  कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. दिवस शुभ आहे.

  वृषभ

  आज अष्टम चंद्र थोडा सुसह्य होईल. वाणी मध्ये गोडवा राहील. घरातल्या प्रत्येकाचा विचार करा..  कार्य क्षेत्रात मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस मध्यम आहे.

  मिथुन

  आज जोडीने  ईश्वरी आशीर्वाद प्राप्त कराल.. संतती ची तक्रार असेल. राशी च्या  पंचम स्थानातील बुध  वाक चातुर्य प्रदान करेल.. आर्थिक बाजु चांगली राहील. आरोग्य थोडे  जपा.

  कर्क

  आज  दिवस  प्रार्थना आणि पूजा या मध्ये जाईल. आज कोणाशीही वाद नको. शत्रुत्व टाळा. आर्थिक घडामोडी, निर्णय पुढे जाऊ द्या. गुरु कृपा व्हावी म्हणून गुरु जप व दान करा. दिवस  मध्यम आहे.

  सिंह

  राशीच्या तृतीय स्थानातील मंगळ व पंचम स्थानातील  शुक्र चैनी कडे कल ठेवतील  खर्च आटोक्यात ठेवा. रागावर नियंत्रण राहू द्या. गुरुकृपा आहेच  पण आज विशेष पुजा करावी.  दिवस  शुभ आहे.

  कन्या

  आज दिवस  दुसर्‍यांची सेवा करण्यात जाईल. घरात खूप काम  निघेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती कडे लक्ष द्या . मंगळ धन स्थानात असून खर्च वाढवेल. तुमच्या  बुद्धीचा उपयोग कार्य क्षेत्रात होईल. शुभ फळ मिळेल.

  तुला

  आज  दिवस नामस्मरण करण्यात घालवा. पुढील दिवसाचे  नियोजन करा.  शनि  कार्यक्षेत्रात अडचणी  निर्माण करेल. पण सध्या काहीही निर्णय घेऊ नका. वाद नको. दिवस चांगला जाईल.

  वृश्चिक

  कुठूनतरी येणारा पैसा  टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्‍न करा. व्यय मंगळ बुध संधी मिळू देणार नाहीत .लाभ होतील. मात्र विपरीत बुद्धी  ,निर्णय नको .गुरु उपासना सुरू करावी.

  धनु

  तुमची रास गुरूची आहे  आज उपासनेत वेळ घालवा. पुढील साधनेसाठी अतिशय शुभ दिवस.  गुरू  लेखक, व्यावसायिक, ज्योतिषी यांना यशदायक आहे.गू ढ अनुभव येतील. दिवस  उत्तम.

  मकर

  आज चंद्र  उच्च आध्यात्मिक अनुभूती  मिळवुन देईल. प्रयत्‍नपूर्वक गुरु उपासना करावी. मंगळ प्रकृती जपा असे सुचवतो आहे. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम जाईल

  कुंभ

  आज दिवस  लाभदायक  आहे. तुम्ही प्रयत्‍न करा संधी चालून येतील. गुरु राशीत असुन बुधा शी शुभ योग करीत आहे. नोकरीत उत्तम संधी, व्यवसाय भरभराटीचा राहील.  दिवस शुभ फळ देईल .

  मीन

  गुरूची प्रिय रास,या व्यक्तींना दिवस  दगदगी चा जाईल. काम खूप वाढेल. पण त्याचे उत्तम फळ मिळेल. गुरु कृपा  होण्यासाठी आज गुरू उपासना आणि जप करावा. दिवस शुभ आहे.

  शुभम  भवतु !!

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya