मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: नवरात्राची दुसरी माळ कुणाला ठरणार फलदायी? वाचा आजचं भविष्य

राशीभविष्य: नवरात्राची दुसरी माळ कुणाला ठरणार फलदायी? वाचा आजचं भविष्य

आज अश्विन शुद्ध द्वितीया दिनांक 8 ऑक्टोबर 2021.आज नवरात्राची दुसरी माळ. दैनंदिन राशीभविष्याबरोबर जाणून घ्या माता ब्रह्मचारिणी पूजेचं महत्त्व आणि महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांविषयी...

आज अश्विन शुद्ध द्वितीया दिनांक 8 ऑक्टोबर 2021.आज नवरात्राची दुसरी माळ. दैनंदिन राशीभविष्याबरोबर जाणून घ्या माता ब्रह्मचारिणी पूजेचं महत्त्व आणि महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांविषयी...

आज अश्विन शुद्ध द्वितीया दिनांक 8 ऑक्टोबर 2021.आज नवरात्राची दुसरी माळ. दैनंदिन राशीभविष्याबरोबर जाणून घ्या माता ब्रह्मचारिणी पूजेचं महत्त्व आणि महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांविषयी...

आज अश्विन शुद्ध द्वितीया दिनांक 8 ऑक्टोबर 2021.आज नवरात्राची दुसरी माळ. आई जगदंबे चा उदो उदो..

आज माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते. माता प्रेम ज्ञान ,आणि एकनिष्ठा याचे प्रतीक आहे . श्वेतांबरा, श्वेत वस्त्रा,जिच्या एका हातात अक्ष माला आहे आणि दुसर्‍या हातात कमंडलू आहे. शिव प्राप्तीसाठी पार्वतीने कठोर तप केले  म्हणून ती ब्रह्मचारिणी. तिचे पूजन केल्यास तेजोवृद्धी होते.

महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठं  म्हणजे तुळजापूर ची  तुळजाभवानी,  कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूर गडाची रेणुका आणि नाशिकची सप्तशृंगी माता. या जागृत  ठिकाणी जगदंबेचा  नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. घटस्थापना  माला बंधन  व सप्त शती पाठ केला जातो. आईची षोडशोपचार पूजा केली जाते. हवन केले जाते.

आता आजच्या ग्रहस्थितीकडे वळू या. आज चंद्र  तुला राशीत भ्रमण करीत असून राहू  कृत्तिका नक्षत्रात वक्र गतीने  प्रवेश करीत आहे. सूर्याच्या नक्षत्रात त्याचे परिणाम काही राशींना फारसे अनुकूल नाहीत.

पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

जोडीदारासाठी  उत्तम दिवस  आहे. अष्टमात शुक्र केतू रोग पिडा देईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. तुमच्या  वाणी चा प्रभाव सगळ्यांवर पडेल. दिवस शुभ.

वृषभ

आज दिवस नेहमी सारखाच जाईल. जास्त दगदग करू नका.  आर्थिक स्थिती ठीक राहील. सौंदर्य प्रसाधन ,उंची वस्त्र यांची खरेदी  होईल. जोडीदाराला  शुभ फळ देणारा  दिवस. वेळ आनंदात घालवा

मिथुन

आज काही नवीन वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये वेळ जाईल. कन्या राशीतील बुध अणि पंचमातील चंद्र,उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ आहे. दिवस शुभ आहे.

कर्क

चतुर्थ चंद्र गुरूशी  शुभ योग करीत आहे.नौकरी आणि घर  दोन्हीकडे  लक्ष द्यावे लागेल. त्याची चांगली फळे  मिळतील. घरात काही विशेष पुजा करण्याचे योग. दिवस उत्तम.

सिंह

तृतीय चंद्र  ,आज छोटे मोठे  प्रवास, मौजमजेसाठी खर्च ,किंवा  बहिण भावाशी संवाद असे योग दाखवित आहे.  भाग्य स्थानाचा स्वामी  मंगळ  धन स्थानात असुन शुभ आहे. दिवस  चांगला आहे.

कन्या

आर्थिक लाभ, ओघवती भाषा, अणि कुटुंब सुख असा हा उत्तम दिवस आहे. त्यासाठी थोडा

वेळ कुटुंबातील व्यक्तींना द्यावा लागेल. लाभ होतील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस शुभ आहे.

तुला

आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही अधिकार बहाल करण्यास वरीष्ठ राजी असतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.  दिवस चांगला जाईल.

वृश्चिक

आज चंद्र  शारीरिक थकवा किंवा जास्ती काम, खर्च दाखवत आहे. लाभ स्थानातील सूर्य अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. दिवस मध्यम.

धनु

आज दिवस लाभदायक आहे  संतती सुख, छोटे प्रवास, उच्च शिक्षणात यश असा हा दिवस  शांततेत पार पडेल. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दिवस चांगला आहे.

मकर

कार्य क्षेत्रात नवीन घडामोडी व्हायला सुरू होतील. अत्यंत सावध राहा. बुद्धीचा कारक बुध भाग्य स्थानात आहे  शत्रू वर नजर ठेवुन रहा .संतती संबंधी काळजी कमी होईल. दिवस शुभ.

कुंभ

आज तुमच्या समोर भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण नवीन संधी, प्रवास, काही समारंभ असे शुभ फळ घेऊन येईल. शुक्र व्यावसायिक  लाभ मिळवुन देणार  आहे. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम

मीन

आज अगदी दगदग ना करता कामावर लक्ष देऊन दिवस पार करायचा आहे. जास्तीचे काम तुम्हाला बिझी ठेवेल आणि थकवा जाणवेल .आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. दिवस संथ आहे.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya