Home /News /astrology /

राशीभविष्य: आज दुपारी शुक्राचं राश्यांतर; अनेकांच्या कार्यक्षेत्रात हालचाली होणार

राशीभविष्य: आज दुपारी शुक्राचं राश्यांतर; अनेकांच्या कार्यक्षेत्रात हालचाली होणार

आज दिनांक 8 डिसेंबर 2021 वार बुधवार तिथी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करणार असून शनि सोबत असेल.

आज दिनांक 8 डिसेंबर 2021 वार बुधवार तिथी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. आज चंद्र  मकर राशीतून भ्रमण करणार असून शनि सोबत असेल. तसेच आज दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनी शुक्र मकर राशीत प्रवेश प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा योग असून बारा राशींना याचे काय फळ मिळेल पाहूया.आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या  दशमातील शनि चंद्र शुक्र कार्य क्षेत्रात मोठी हालचाल दाखवतात. शुक्र अनपेक्षित संधी मिळवून देईल. मात्र  थोडा संथ गतीने बदल होईल. सकारात्मक रहा. दिवस चांगला. वृषभ राशीच्या भाग्य स्थानात येणारा शुक्र अतिशय अनुकूल आहे. लांबचे प्रवास, उत्तम खरेदी, तसेच समारंभात सहभाग असा हा दिवस  शुभ असुन आनंदात जाईल. मिथुन अष्टमात झालेली ग्रहांची गर्दी प्रकृती जपा असाच संकेत देत आहे. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावे. पायाची काळजी घ्यावी. मात्र आर्थिक लाभ होतील. मन स्वास्थ्य जपा. दिवस मध्यम. कर्क राशीच्या सप्तम स्थानात शुक्र शनि चंद्र  जोडीदाराला अनुकूल असला तरी गैर समज निर्माण करू शकतो. नवीन स्थळ येईल. व्यापारउद्योगात उत्तम फळ देईल. दिवस शुभ. सिंह षष्ठ स्थानात आलेले चंद्र शनि शुक्र अचानक नवीन संधी घेऊन येतील. मातुल पक्षाची भेट होईल.त्याचा फायदा देखील होईल.आर्थिक घडामोडी होतील. कर्ज फेड होईल. दिवस चांगला. कन्या राशीच्या पंचम स्थानात येणारा शुक्र अनेक लाभ देईल. संतती चिंता आता कमी होईल. ईश्वरी उपासना चांगले फळ देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे.दिवस शुभ. तुला चतुर्थ स्थानात प्रवेश करणार शुक्र शुभवर्तमान घेऊन येईल. घरत मंगल कार्य ,उंची वस्तूंची खरेदी  किंवा अचानक येणारे पाहुणे असा हा दिवस अतिशय आनंदात जाईल. वृश्चिक तृतीय शुक्राचे भ्रमण लाभदायी असून कलाकारांना उत्तम संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देईल. बहिण भावंडांना शुभ काळ  चांगला दिवस. धनु धन स्थानात येणारा शुक्र आर्थिक घडी घालून देईल. अनेक मार्गानी पैसा मिळेल.महत्त्वाचा फोन येईल. नातेवाईकांना भेट द्याल. आनंदात दिवस जाईल. मकर राशीतील  ग्रहाधिक्य मन थोडे अस्वस्थ राहील. मात्र  शुक्र शनि मुळे अचानक घटना घडतील. अनेक लाभ संभवतात. प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ  आहे. दिवस शुभ कुंभ व्यय स्थानात असलेले ग्रह शारीरिक कष्ट  व आर्थिक व्यय दाखवतात. परदेशी सबंधित घटना घडतील. प्रकृती जपा. काहींना मानसिक ताण जाणवत राहील. दिवस मध्यम. मीन लाभ स्थानात शुक्र शनि चंद्र अकस्मात लाभ, संतती संबंधी शुभ घटना दर्शवतात. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला. शुभम भवतु !!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या