आज मंगळवार दिनांक 7 September 2021. भाद्रपद प्रतिपदा. आज चंद्र दिवसभर कन्या राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य .
मेष
आज दिवस थोडा दगदगीचा आहे. नवीन काम, निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती ठीक राहील. पण कोणाला उधार देणे टाळा. शत्रू पासून सावध रहा. नातेवाईकांना भेट किंवा फोन होईल. दिवस मध्यम जाईल.
वृषभ
नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामाचा ताण वाढेल. मुलांना समजून घेणे आवश्यक राहील नवीन कला, विद्या शिकण्यास अनुकूल दिवस. मानसिक ताणतणाव कमी होतील. दिवस चांगला जाईल.
मिथुन
चंद्राचे चतुर्थ स्थानात भ्रमण असणार आहे. आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन अडचणी येतील. काही बदल झाले तर स्वीकार करा. आर्थिक स्थिती ठीक राहील. घराकडे लक्ष देणे गरजेचे राहील दिवस शुभ आहे.
कर्क
कुटुंब स्थानात आता एकटा रवि असून चंद्र तृतीय स्थानात आहे. बहीण भावाशी संवाद किंवा भेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. प्रवास योग येतील. दिवस सर्व सामान्यपणे जाईल.
सिंह
आज आर्थिक भरभराट होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून प्राप्तीचे योग आहेत. जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नकोत. वाद होतील. नवीन काही सुरू करणे टाळा. दिवस चांगला.
कन्या
आज राशीतील चंद्र शुभ आहे. दिवस शांततेत पार पडेल. राशीत आलेला मंगळ, बुध त्वचा रोग निर्माण करेल. रागीट स्वभाव होईल. काम जास्ती पडेल. काही ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम.
तुला
प्रकृतीची काळजी, मानसिक ताण, आणि थकवा असा आजचा दिवस आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येऊ शकते. राशीत आलेला शुक्र सुखद अनुभव देणार आहे. संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. ईश्वरी उपासना करावी. दिवस मध्यम जाईल.
वृश्चिक
घरात होणार्या अवाजवी खर्चाला आता कात्री लावणे गरजेचे आहे. लाभ स्थानातील चंद्र भ्रमण आज काही मित्रांची भेट घडवून आणेल.
संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये संभाळून निर्णय घ्या. दिवस चांगला आहे.
धनु
आजचा दिवस ऑफिसमध्ये जास्तीची जबाबदारी, ताण आणि काही आवश्यक काम उरकून टाकण्याचाआहे. घराकडे लक्ष द्या. जोडीदाराची प्रगती संभवते. एकूण मिश्र दिवस आहे.
मकर
भाग्य स्थानातील चंद्र, मंगळ, उत्तम भाग्याची साथ मिळवून देतील. छोटे प्रवास किंवा त्याची आखणी, असा हा दिवस आहे. भावंडाची साथ मिळेल. राशीतील शनिमुळे कधीतरी निराशा येते उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. धार्मिक कार्य घडेल. शुभ दिवस.
कुंभ
आज दिवस संथ, कंटाळवाणा जाईल. अष्टमात आलेला मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे.जास्तीची कामे त्रास देतील. शरीर साथ देणार नाही. गृह चिंता सतावू शकते. पत्नीच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी खर्च होईल. जपून रहा असा संकेत आहे.
मीन
तुमचे आपल्या जोडीदाराशी सूर जुळतील. मात्र सप्तम स्थानात आलेला मंगळ,बुध काळजीपूर्वक रहा असे सुचवत आहे.जोडीने प्रवास, खरेदी कराल मुलांची उत्तम प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल दिवस चांगला जाईल.
शुभम भवतु!!