• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: घटस्थापनेबरोबर या 3 राशींचं भाग्य फळफळणार

राशीभविष्य: घटस्थापनेबरोबर या 3 राशींचं भाग्य फळफळणार

नवरात्रीला प्रारंभ

नवरात्रीला प्रारंभ

शारदीय नवरात्रौत्सवास (Navratri 2021) आज प्रारंभ होत आहे. घटस्थापनेचा मुहूर्त कुठला? कशी करावी आराधना? तुमच्या राशीत आजची पहिली माळ कशी? वाचा सविस्तर....

  • Share this:
आज दिनांक 7 ऑक्टोबर 2021.गुरुवार .आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. शारदीय नवरात्रारंभ आदिशक्ती जगदंबेच्या  प्राणपूजेचा महा उत्सव. दैत्य असुर भयंकर माजले  तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ति देऊन जगतजननी दुर्गेची निर्मिती केली. तिने सर्व असुरांचा संहार केला. नामजप, अखंड ज्योत, उपवास, घट स्थापना, सप्तशती पाठ  नवचंडी हवन, कुमारिका पूजन असे तर्‍हेतर्‍हेनी तिचे पूजन केले जाते. अत्यंत पवित्र असा हा  काळ आहे.  आई जगदंबे चा उदो उदो! नवरात्रात पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीचे पूजन केल्या जाते. गिरीकन्या  पार्वती ही कुमारिका आहे. नवदुर्गांपैकी  ही अतिशय श्रेष्ठ असून  हिचे वाहन बैल आहे. दोन्ही हातात त्रिशूल व कमल धारण केले आहे. तिला त्रिवार वंदन. या दिवसात जितकी जमेल तितकी देवीची आराधना करावी. चंडी कवच, कुंजिका  स्तोत्र यांचा पाठ करावा. नवार्ण  मंत्राचा नियमित जप करावा. आज चंद्र सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी तुला राशीत प्रवेश करेल. घट स्थापना बाराच्या आत करणे  योग्य . आजचे बारा राशींचे  भविष्य .. मेष आज आपल्या रागीट स्वभावाला काबूत ठेवून काम करा. गुरु, शनि दशम स्थानात  असून  लाभदायक  घटना घडतील. शुक्र जोडीदाराला उत्तम आर्थिक लाभ देईल. दिवस चांगला आहे. वृषभ काही  जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल.  पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति  खर्च टाळा. दिवस मध्यम . मिथुन कामात आणि शिक्षणात  प्रगती होईल. प्रकृती  अस्वस्थ वाटत असेल  तर  आज जपून रहा. खर्च वाढेल. मुलांकडे  जास्त लक्ष द्यावे लागेल. शक्ति आराधना करावी. कर्क तृतीय मंगळ थोडी  धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा. लवकरच सगळे ठीक होईल. सप्तम शनि, जोडीदाराला त्रासदायक ठरेल. घरातल्या शुभ घटनांची सुरवात. दिवस अनुकूल आहे. सिंह कुटुंब ही तुमची प्राथमिकता आहे. आज दिवस समाधानात जाईल. राशीच्या  धनस्थानातील मंगळ आणि तृतीय चंद्र  प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. दिवस  चांगला आहे. कन्या आज आर्थिक घडामोडी  होतील  कुटुंबियांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच उत्साही असतो. आजही  दिवस तसाच आहे. चांगले फळ मिळेल. तुला राशीत चंद्र  ,व्यय स्थानातील मंगळ.मातेचं  आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली  विजेची उपकरणे सांभाळून वापरा  दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा. वृश्चिक व्यय स्थानातील चंद्र ,मतभेद, कुरबुरी  घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय  घ्या. अचानक  छोटा प्रवास  संभवतो. जरा जपून रहा. धनु आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो  मित्रांशी वाद करु नका. नोकरी  व्यवसायातून लाभ  संभवतात. मात्र  सरळ मार्गाने जा. साडेसाती असली तरी गुरुकृपेने मार्ग निघेल. जगदंबेचा उदो  उदो. मकर राशी स्थानात मार्गी गुरू महाराज शुभ फळ देतील. आप्तेष्टांना नाराज करू नका. त्यांना महत्त्व द्या. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. दिवस चांगला आहे. कुंभ दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे  प्रवास योग  येतील. भाग्य साथ देईल. शत्रू पिडा संभवते. पण विजय  तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही  धार्मिक कामात मन रमेल. मीन जरा जपून राहावे असे  ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची ठरेल. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती  कडे  लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे. जगदंबा प्रसन्न राहील शुभम भवतु!!
First published: