आज दिनांक 7 डिसेंबर 2021 मंगळवार, मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी. अंगारकी चतुर्थी. चंद्राचे भ्रमण मकर राशीतून राहील. चंद्र शनि विष योग होईल. तेव्हा सर्व राशींना हे भ्रमण काय परिणाम करेल पाहूया, आजचे बारा राशीचे भविष्य.
मेष
कार्यालयीन कामकाज वेग घेईल. महत्त्वाचे निर्णय होतील. दिवस नेहमी प्रमाणे पार पडेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील. दिवस चांगला.
वृषभ
भाग्य आज साथ देईल. दिवस आनंदात जाईल.कार्याची तयारी उत्साहाने कराल. लहानसहान समारंभ किंवा पूजा यामधे भाग घ्याल. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ.
मिथुन
राशीच्या अष्टमात आलेला चंद्र शनी पुन्हा एकदा नैराश्य आणि तणावाचा सामना करायला लावेल. प्रकृती जपा. मानसिक आंदोलने होतील. दिवस मध्यम.
कर्क
आज भागीदारीमध्ये तणावपूर्ण वातावरण राहील. दोघे मिळून काही खरेदी होईलकिंवा नवीन व्यक्ती भेटेल. आर्थिक बाजू चांगली राहील.. दिवस नेहमी सारखाच पार पडेल.
सिंह
षष्ठ स्थानात चंद्र शनि प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक देणेघेणे टाळा. शत्रू पासून सावध रहा. तुमच्या वर असलेली गुरुकृपा सर्व अडचणींवर मात करेल. दिवस बरा जाईल.
कन्या
आज पंचमात चंद्र शनि, शुक्र असे शुभ योग आहेत. मार्केटिंग मध्ये फायदा होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. मुलांच्या प्रकृती कडे दुर्लक्ष नको. दिवस चांगला.
तुला
आज घरासाठी काही विशेष कार्य आयोजित कराल. कुटुंबातील व्यक्तीची काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. त्यासाठी खर्च ही होईल. पण दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक
तृतीय शनि चंद्र, आज प्रवास किंवा काही महत्त्वाचे फोन येतील. दिवस कुटुंबातील व्यक्तींच्या सोबत आनंदात घालवाल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस अनुकूल.
धनु
आज दिवस आर्थिक लाभ घडविणारा आहे. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहे त.प्रकृती उत्तम राहील. भाग्य जोरावर आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस चांगला जाईल.
मकर
आज राशीत शनि चन्द्र आहेत. मन चिंतीत राहील. मंगळ वाहने जपून चालवा असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. आर्थिक स्थिती ठीक राहील. मध्यम दिवस.
कुंभ
आज व्यय स्थानात शनि चंद्र परदेश संबंधी काही निर्णय होतील. आर्थिक व्यय होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. समारंभाचे आयोजन केले जाईल.
मीन
आज दिवस ज्येष्ठ व्यक्ती कडून लाभ मिळवुन देणारा आहे.तृतीय राहू प्रवास योग आणतो. . गुरु सामाजिक प्रतिष्ठा जपा असे सुचवतोय. दिवस शुभ.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.