Home /News /astrology /

राशीभविष्य: मेष राशीला मिळणार हवेहवेसे अनुभव; 2 राशींनी आर्थिक बाजू जपावी

राशीभविष्य: मेष राशीला मिळणार हवेहवेसे अनुभव; 2 राशींनी आर्थिक बाजू जपावी

आज दिनांक 5 डिसेंबर 2921 तिथी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा , रविवार. मेषेच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. कुंभ राशीलाही मिळेल लाभ. दोन राशींनी मात्र सांभाळा.. वाचा दैनंदिन राशीभविष्य

आज दिनांक 5 डिसेंबर 2921 तिथी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा , रविवार. आज चंद्र सकाळी 10.51 नंतर धनु राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण सुखद आणि हवे हवेसे अनुभव देईल. तुमचा मान सन्मान वाढेल.  घरात काही विशेष  बोलणी सुरू होतील. प्रकृती  चांगली राहील. दिवस उत्तम आहे. वृषभ आज वृषभ राशीच्या व्यक्ती साठी  दिवस ताण तणावाचा आहे. उगीच थकवा   जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी घरांमधे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद  होतील. दिवस मध्यम  आहे. मिथुन आज दिवस व्यवसाय  आणि नोकरीसाठी उत्तम असून जोडीदाराची मदत मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील.   घरासाठी खरेदीची कल्पना  येईल .पण  घाईने निर्णय घेऊ नका. दिवस बरा जाईल. कर्क आज दिवस संथ अणि कंटाळवाणा असेल. खूप काम पडेल  पण मन रमणार नाही. आर्थिक बाजू ठीक आहे. अचानक मोठा खर्च येऊ शकतो. गुरूची उपासना करावी. दिवस मध्यम. सिंह आज संतती साठी काही तरी  छान करावे लागेल. त्यासाठी खर्च ही होईल.  धार्मिक गोष्टी मध्ये वेळ घालवाल. प्रकृती जपा. काहींना अचानक धनलाभ होईल. दिवस शुभ. कन्या आज सगळा वेळ घरासाठी द्यावा लागेल. त्यात  साफसफाई, काही नवीन  बदल कराल. आर्थिक बाजू जपा. जास्तीचे खर्च उभे राहतील. गुरु जप करा. दिवस बरा जाईल. तुला आज छोटा प्रवास घडेल. धन स्थानातील बुध व्यवसाय संधी मिळवुन देईल. धैर्य आणि चिकाटी वाढवेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल .सूर्य मंगळ  नोकरीच्या ठिकाणी सांभाळून रहा  आणि काळजी घ्या असे सांगतो आहे. वृश्चिक आर्थिक लाभ संभवतात. बुद्धी चा वापर करून एखादे काम  तुमच्या हाताने  छान पार पडेल. कार्यक्षेत्रात तुमचा  प्रभाव वाढेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळेल. प्रकृती जपा. दिवस उत्तम जाईल. धनु व्यय सूर्य मंगळ वडीलधारी व्यक्ती काही लाभ करेल. धार्मिक कामात रुची वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. काहींना भावंडाची साथ मिळेल. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.  दिवस चांगला जाईल . मकर लाभ स्थानात आलेला मंगळ  शुभ संकेत देत आहे. कुटुंबात काही नवीन व्यक्तीचे आगमन होईल. मधल्या काळात बरेच सोसावे लागले. आता त्याची तीव्रता कमी होईल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ कुंभ मार्गी गुरू अणि लाभातील चंद्र  शुभ फळ देतील. जोडीदाराची काळजी घ्या. काही खर्च ही होईल. भागीदारीचे  निर्णय  चुकू शकतात. खर्च वाढेल. पण लाभ ही होतील. दिवस उत्तम जाईल. मीन आजचा दिवस हा  कष्ट करण्याचा आहे.  कामावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी  सावध रहा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे शत्रू फारसे टिकणार नाहीत. कार्यालयात जास्त काम पडेल. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या