• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: 2 राशींना आज मिळणार आर्थिक लाभ, पाहा तुमच्या भविष्यात काय

राशीभविष्य: 2 राशींना आज मिळणार आर्थिक लाभ, पाहा तुमच्या भविष्यात काय

आज शनिवार दिनांक 4 September 2021 श्रावण कृष्ण द्वादशी. अश्वत्थ मारुती पूजन करावे. तुमचे ग्रह काय सांगतात वाचा...

  • Share this:
आज शनिवार दिनांक 4 September  2021 श्रावण कृष्ण द्वादशी. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार असून अश्वत्थ मारुती पूजन करावे. पाहूया बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र उच्चीचा असून तुम्हाला उत्तम गृहसौख्य देईल. घरात शुभता येईल. घर सजावट, साफसफाई यात दिवस जाईल. शुभ दिवस. वृषभ आज तृतीय चंद्र  आहे, प्रवास  घडेल. काही महत्त्वाचे फोन येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. दिवस आरामात घालवा. मिथुन आज धन स्थानातील ग्रह  कुठूनतरी आर्थिक लाभ मिळवून देणार आहेत. कुटुंब सुख  मिळेल. कुटुंबीयांना हवा तसा वेळ द्याल. दिवस शुभ आहे. कर्क राशी च्या धन स्थानात रवि मंगळ आहेत. जपून रहा. कायद्याचे उल्लंघन करू नका. राशीतील उच्च चंद्र अणि  तृतीय शुक्र शुभ फल देईल.  प्रवास किंवा आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. सिंह आज चंद्र बाराव्या स्थानात असून काही नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक बाबींसाठी खर्च संभवतो. मुले खुश राहतील. दिवस मध्यम आहे. कन्या आज दिवस मित्र मैत्रिणींसोबत  ,कुटुंबीय सोबत मजा करण्याचा आहे  लाभ होतील. नवीन खरेदी होईल. प्रकृती साथ देईल. तुमच्या चांगल्या कामासाठी मदत मिळेल. दिवस शुभ आहे. तुला आज शनिवार असूनही काही अचानक काम आले तरी करावे लागेल. त्यासाठी काही नियोजन करून ठेवा. घरी देखील वेळ द्या. दिवस बरा जाईल. वृश्चिक चंद्राच्या शुभ  प्रभावात असलेल्या वृश्चिक व्यक्तींना आज  आनंदी राहण्याचा संकेत आहे. परोपकार, हाती घेतलेल्या कामात यश  आणि प्रशंसा मिळेल.  दिवस शुभ आहे. धनु आज अष्टमात आलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. वाहन चालवणे टाळा . आर्थिक नुकसान संभवते. एकूण मिश्र फळ देणारा दिवस आहे. मकर सप्तम चंद्र, शनिच्या प्रतियोगात आहे. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती ठीक. दिवस चांगला. कुंभ आज दिवसभर  थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी बोलाचाली करू नका. शत्रू निर्माण होतील. आर्थिक व्यवहार टाळा. दिवस  शांततेत घालवा. मीन आज दिवस मुलांच्या मागण्या, पुरवण्यात जाणार आहे. अध्यात्मिक कल  होईल. वाचन किंवा अभ्यास उत्तम होईल. दिवस आनंदात जाईल.
First published: