मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: शनि अमावास्येलाच आहे सूर्यग्रहण; कुठल्या राशीसाठी आजचा दिवस चिंतेचा?

राशीभविष्य: शनि अमावास्येलाच आहे सूर्यग्रहण; कुठल्या राशीसाठी आजचा दिवस चिंतेचा?

आज शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 कार्तिक अमावास्या.  शनि अमावास्या. ग्रहण वेध पळण्याची गरज नाही, कारण आपल्या देशातून ते दिसणार नाही. पण..

आज शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 कार्तिक अमावास्या. शनि अमावास्या. ग्रहण वेध पळण्याची गरज नाही, कारण आपल्या देशातून ते दिसणार नाही. पण..

आज शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 कार्तिक अमावास्या. शनि अमावास्या. ग्रहण वेध पळण्याची गरज नाही, कारण आपल्या देशातून ते दिसणार नाही. पण..

आज शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 कार्तिक अमावास्या.  शनि अमावास्या. ग्रहण वेध पळण्याची गरज नाही. या काळात दान करणे योग्य राहील. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार असून मंगळाचा उत्तररात्री राशीमध्ये प्रवेश होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या अष्टमात होणारे ग्रहण अणि अमावास्या  ही चिंता निर्माण करणारी आहे. अवचित होणारे वाद, अपघात यापासून सावध रहा. गुरु कृपा राहील. तरीही आज जपुन राहण्याचा दिवस आहे.

वृषभ

सप्तम स्थानात होणारे अमावास्या अणि ग्रहण जोडीदाराला फारसे अनुकूल नाही.व्यावसायिक चिंता सतावू शकते. कलहामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तरी उपासना करावी. दिवस मध्यम जाईल .

मिथुन

षष्ठ स्थानात होणारे सूर्यग्रहण अमावास्या काही आर्थिक चिंता, शत्रू पीडा करणारी आहे. मामा मावशीला फारशी बरी नाही. मात्र परदेशी प्रवासासाठी बोलणी होतील. दिवस बरा.

कर्क

पंचमात स्थानात होणारी ग्रहांची गर्दी संतती चिंता लावेल. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या सोबत वेळ घालवा. आरोग्य ठीक राहील. अमावास्या हुरहूर लावणारी आहे. उपासना करावी.

सिंह

राशीच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणारे ग्रह गृह चिंता, कलह किंवा अचानक घडणार्‍या घटना घडवतील. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी लागून राहील. दिवस बरा आहे.

कन्या

आज अमावास्या तुम्हाला भावंडांची चिंता लावणारी आहे. त्यांच्याशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय टाळा. कुठल्याही भानगडीत अडकू नका. दिवस मध्यम जाईल .

तुला

धन  कुटुंब वाणी स्थानात होणारी अमावास्या  कुटुंबीयांना त्रास देणारी ठरेल.आर्थिक व्यवहार जपून करा. कठोर बोलणे टाळा. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत खंबीर रहा. दिवस बरा.

वृश्चिक

आज राशी मध्ये होणारे ग्रहण आणि अमावास्या  अतिशय जपून राहण्याचा संकेत देत आहे.वाहन, प्राणी, यापासून सावध रहा. प्रवास टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.  नामजप अणि दान करा. दिवस मध्यम आहे.

धनु

धनु व्यक्तींना अतिशय जपून राहण्याचा दिवस आहे. व्यय स्थानात चंद्र मानसिक ताण, आर्थिक संकट किंवा दवाखान्यात जाण्याची वेळ आणेल. सांभाळून असा. प्रवास टाळा. दिवस मध्यम .

मकर

आज जरी अमावास्या असली तरी फारसे काही घडणार नाही. प्रवास टाळा. मित्रमैत्रिणींना भेट द्या. संतती चिंता लागून राहील. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. दिवस बरा.

कुंभ

आज दशमातील चंद्र भ्रमण अचानक होणारे बदल, खूप जबाबदारी असे सुचवत आहे. सावध रहा. वडीलधारी व्यक्ती भेटेल. त्यांची काळजी घ्या. दिवस अनुकूल.

मीन

भाग्यशाली रास. त्यातल्या त्यात बरे परिणाम मिळतील. संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. भेट होईल. चिंता दूर होईल. काही विशेष खरेदी  कराल.  दिवस चांगला.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya