• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशींसाठी आहे आजचा दिवस लाभदायक, होईल शुभ कार्यांना सुरुवात

राशीभविष्य: या राशींसाठी आहे आजचा दिवस लाभदायक, होईल शुभ कार्यांना सुरुवात

आज सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021.श्रावण कृष्ण अष्टमी.जन्माष्टमीच्या सर्व बंधू भगिनींना मनःपुर्वक शुभेच्छा. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Share this:
आज  सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021.श्रावण कृष्ण अष्टमी.जन्माष्टमीच्या सर्व बंधू भगिनींना मनःपुर्वक शुभेच्छा. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष पंचम  स्थानात असलेला मंगळ सूर्य अतिशय शुभ असुन पराक्रम, बुद्धिमत्ता, संभाषण कला ,यात वाढ करेल.  तुमच्या बुद्धी आणि वाणी चातुर्याने तुम्ही सगळ्यांना जिंकून घेणार आहात.आर्थिक दृष्ट्या दिवस शुभ आहे. वृषभ चतुर्थ स्थानात असलेले  मंगळ रवि  व्यावसायिक क्षेत्रात भरघोस मदत करतील. कुटुंब सुख ,उच्च विचार व संभाषण चातुर्य यात वाढ होईल. राशीतील राहू चंद्र आजही मानसिक ताण व  अस्वस्थता निर्माण करतील. दिवस  चांगला जाईल. मिथुन आज चतुर्थ स्थानात असलेल्या शुक्र बुधाची स्वराशी कन्या असल्याने घर व वाहन यासंबंधी शुभ फळ देईल. घरांमधे समारंभ होईल. तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल.  व्ययस्थानातील चंद्र राहू मनावर सावट आणणार आहेत. बाकी  दिवस ठीक आहे. कर्क तृतीय स्थानात  बुध शुक्रासोबत राजयोग करीत असून परदेश गमन ,त्यासंबंधी  सर्व  कागदपत्रे आणि प्रवास  यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरी, व्यवसाय पूरक आहे. फक्त थोडे खर्चावर नियंत्रण ठेवावे.  लाभदायक दिवस. सिंह राशीत येणारे  रवि  मंगळ शुभ फळ आणि उत्तम लाभ  देतील .मैत्रिणी  किंवा  बहिणी तुम्हाला  उत्तम सल्ला देऊन  फायदा करून देतील. शिक्षण, परीक्षा  याकरता शुभ  काल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती  सुखावह राहील. खर्च बेताने करा. गुरु कृपेचा लाभ घ्या. कन्या राशी स्वामी बुध उच्च राशीत ,भाग्यात चंद्र आहे. नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ काळ आहे. नवीन संधी, हाती घेतलेल्या कामात यश, प्रमोशन, असा हा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. शुभ घटनांना आता सुरवात होईल.दिवस चांगला. तुला आज व्यय स्थानात  असलेले बुध शुक्र आणि सिंह रवि  भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे. अचानक लाभ,परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश  असा हा दिवस  आहे.  धर्मा बद्दल आस्था वाढेल. शुभ कार्य घडतील. दिवस शुभ. वृश्चिक सध्या झालेले  बुधाचे   कन्या राश्यांतर  लाभ स्थानात आहे .वृश्चिक व्यक्तींना जाणवणारा निरुत्साह संपून नवीन जोश येईल.सखोल अभ्यास सुरू होऊन यश मिळेल. गृह सजावट,आर्थिक घडामोडी  यांना प्राधान्य मिळेल.  चंद्र शुभ फळ  देईल. दिवस चांगला. धनु दशम स्थानात शुक्र बुध  राश्यांतर  फार चांगले फळ देणार असून भागीदारी मध्ये सामंजस्य निर्माण करेल. करार यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील.षष्ठ स्थानात असलेले राहू चंद्र शत्रू वर विजय मिळवून देतील. दिवस शुभ आहे. मकर राशीच्या अष्टम स्थानातील रवि मंगळ प्रकृती चिंता, नातेवाईकांशी  भेट, त्यापासून काही त्रास असे फळ देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळेल. संतती चिंता कमी होईल. दिवस चांगला. कुंभ अष्टमात होणारा बुध शुक्र राजयोग,सर्व तर्‍हेने शुभफल देणारा आहे  .आर्थिक प्राप्ती, संतती सुख  उत्तम मिळेल. .आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी होईल. घराकडे लक्ष  द्यावे लागेल. शुभ दिवस. मीन सातव्या स्थानातील शुक्रबुध शुभ असुन ,जोडीदार, कुटुंब  ही तुमची प्राथमिकता राहणार.  नवीन वास्तूचे स्वप्न सत्यात येईल. प्रवास योग येतील. महत्त्वाचा फोन येईल. नोकरीसाठी फार चांगला काळ असून  नवीन संधी प्राप्त होतील. दिवस चांगला जाईल.
Published by:Pooja Vichare
First published: