मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: 3 राशींना पुढचे 2 दिवस आनंदाचे; या राशीने मात्र हेवेदावे टाळावेत

राशीभविष्य: 3 राशींना पुढचे 2 दिवस आनंदाचे; या राशीने मात्र हेवेदावे टाळावेत

आज शुक्रवार दिनांक  3 September 2021 आज तिथी आहे श्रावण कृष्ण एकादशी. चंद्र आज कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या चंद्राचा फायदा 3 राशींना मिळेल. तुमची रास आहे का यात पाहा...

आज शुक्रवार दिनांक  3 September 2021 आज तिथी आहे श्रावण कृष्ण एकादशी. चंद्र आज कर्क राशीत प्रवेश करणार आहे  10 वाजून 21 मिनिटानी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा चंद्र घरांमधे काही विशिष्ट घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात सुसंधी मिळतील. मन स्थिर राहील. दिवस शुभ.

वृषभ

आज दुपारनंतर काही महत्त्वाचे फोन येतील. तुमच्या  साठी प्रवास योग घेऊन आलेला चंद्र  दोन दिवस आनंद देणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील  दिवस शुभ .

मिथुन

आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल. शुक्र बुध घरांमधे सुखद अनुभव देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. भाग्यशाली दिवस.

कर्क

आज दुपारनंतर मनावरचा ताण सैल होईल. प्रवास योग बनतील .धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती करेल. दिवस चांगला  आहे.

सिंह

आज व्यय स्थानात प्रवेश करणारा चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. राशीतील मंगळ सूर्य  आणि कुंभ गुरू  एक प्रकारची ऊर्जा  निर्माण करीत आहेत. दिवस बरा जाईल.

कन्या

राशीच्या लाभ स्थानातील चंद्र भ्रमण अतिशय शुभ असुन वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करेल. संतती सुख मिळेल.मुलांना वेळ द्याल. दिवस शुभ.

तुला

दशमातील  चंद्र  अचानक कामाचा ताण निर्माण करेल. पण तुम्ही तो निभावून न्याल. येणारे दोन दिवस आनंदी व मौजमजेचे राहतील. खर्च वाढेल.

वृश्चिक

भाग्य स्थानात प्रवेश करणारा चंद्र  गेल्या काही दिवसापासुन वाटणारा ताण कमी करेल. प्रवास योग येत आहेत. प्रकृती उत्तम ठेवा. म्हणजे दिवस  आनंदात  जाईल.

धनु

आज अष्टमात आलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. दगदग टाळा. प्रवास नकोच. आर्थिक स्थिती बरी राहील. दिवस  मध्यम.

मकर

दिवस  आनंदाचा संदेश घेऊन येत आहे. पराक्रम, चिकाटी वाढेल. व्यवसायातून लाभ. प्रवासात सावध रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका.  जोडीदाराकडून लाभ. दिवस शुभ.

कुंभ

षष्ठ चंद्र आज नकोसे विचार, आर्थिक गैरसोय, अणि हेवेदावे याने  तुम्हाला त्रस्त करेल.  शांत रहा. मातृ पक्षातील व्यक्ती भेटतील. दिवस मध्यम जाईल.

मीन

संतती साठी काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी खर्च देखील होऊ शकतो. जोडीदाराची उत्तम साथ  लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश. दिवस शुभ.

शुभम  भवतु !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya