आज दिनांक 29 september 2021.बुधवार तिथी अष्टमी/नवमी. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज दिवसभर चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल. बहीण भावाशी संपर्क होईल.आर्थिक बाजू भक्कम राहील. गुरुकृपा राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. दिवस अनुकूल आहे.
वृषभ
कुठूनतरी अचानक मिळणारा पैसा आनंदित करेल. तुम्ही आज कुटुंबाला वेळ द्या. फार दगदग टाळा. संतती चिंता वाटेल. गुरुची कृपा राहील. दिवस उत्तम.
मिथुन
आज राशीत असलेल्या चंद्र आणि पंचमात असलेल्या शुक्राचे शुभ पडसाद उमटतील. कठोर बोलणे टाळा. घरात वाद नको. दिवस शांततेत पार पडेल.
कर्क
संध्याकाळपर्यंत जरा धीर धरा. फारसे धाडस नको. प्रवास टाळा. व्यय स्थानातील चंद्र आर्थिक घडी मोडेल. शांततेत दिवस घालवणे योग्य ठरेल.
सिंह
दिवस उत्तम असून आर्थिक चिंता नको. फक्त उधळपट्टी टाळा. घरात कोणाशी वाद करू नका . शत्रू टिकणार नाही. वाहन सांभाळून चालवा. प्रवास योग येतील. दिवस चांगला.
कन्या
आज आराम करा. मानसिक थकवा दुर होईल. अति विचार करू नका. संतती चिंता तुम्हाला सतत असते. रागावर ताबा असूद्या. दिवस चांगला.
तुला
भाग्य कारक दिवस . व्यय स्थानात असलेले ग्रह शारीरिक कष्ट देतात तिकडे सतत लक्ष असू द्या. बाकी आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस चांगला.
वृश्चिक
अष्टमात असलेला चंद्र आणि व्यय स्थानात असलेला शुक्र सतत काही तरी काम मागे लागेल . प्रकृती जपा. अति दगदग टाळा. दिवस फारसा अनुकूल नाही.
धनु
आज दोघांनी जोडीने बाहेर जाण्याचा दिवस आहे. मौजमजा करा. शुक्र अनेक लाभ मिळवून देईल. . ऑफिस मध्ये जास्तीचे काम पडेल. दिवस शुभ आहे.
मकर
प्रकृतीच्या तक्रारी वाढतील. मानसिक ताण, आर्थिक जबाबदारी, खर्च येईल. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. दिवस फारसा अनुकूल नाही.
कुंभ
पंचमात दिवसभर चंद्र भ्रमण आहे. मुलांसाठी त्यांच्या गरजेचे सामान खरेदी करावे लागेल. त्यांच्यावर खर्च होईल. शत्रू वर विजय मिळेल. दिवस उत्तम.
मीन
आज गृह सौख्य भरपूर मिळेल. पण जास्तीचे काम ही करावे लागेल.कार्य ठरेल. दिवस उत्तम असून आनंदात घालवा. गुरु जप करत असावा. शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.