मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: या 2 राशींचं भाग्य फळफळणार; संपत शनिवार कसा असेल तुमच्यासाठी?

राशीभविष्य: या 2 राशींचं भाग्य फळफळणार; संपत शनिवार कसा असेल तुमच्यासाठी?

आज दिनांक 28 ऑगस्ट 2021.श्रावण षष्ठी. आज शनिवार, संपत मारुती पूजन. तुमच्या राशीचं भविष्य वाचा सविस्तर..

आज दिनांक 28 ऑगस्ट 2021.श्रावण षष्ठी. आज शनिवार, संपत मारुती पूजन. तुमच्या राशीचं भविष्य वाचा सविस्तर..

आज दिनांक 28 ऑगस्ट 2021.श्रावण षष्ठी. आज शनिवार, संपत मारुती पूजन. तुमच्या राशीचं भविष्य वाचा सविस्तर..

आज दिनांक 28 ऑगस्ट 2021.श्रावण षष्ठी. आज शनिवार, संपत मारुती पूजन. आजचे ग्रहमान- चंद्र भरणी नक्षत्रात  मेष राशीत असून  बुध कन्या राशीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीतील चंद्र मंगळ नवपंचमात असून दिवस नित्या प्रमाणे जाईल. संतती संबंधी थोडी चिंता वाटेल. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. तुमच्यावर लोकांची नजर राहील. जरा जपून रहा. दिवस बरा.

वृषभ

आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भ्रमण मानसिक आणि आर्थिक ताण देईल.  थोडी चिडचिड होईल. नको ती कामे गळ्यात पडतील. शांत रहा. दिवस मध्यम आहे.

मिथुन

राशीच्या लाभ स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. मित्र मैत्रिणींसोबत संवाद होईल. घरात काही सौंदर्य पूर्ण वस्तू खरेदी कराल.

कर्क

राशीच्या धनस्थानातील सूर्य मंगळ कुटुंबातील व्यक्ती सोबत वाद निर्माण करतील. आर्थिक घडामोडी होतील. प्रवासाची आखणी कराल. दिवस उत्तम.

सिंह

आज भाग्य तुमची साथ देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रकृती जपा. उष्णतेचे विकार त्रास देतील. दिवस चांगला जाईल

कन्या

आज अष्टमात चंद्र असून खूप दगदग होणार असे वाटते आहे. राशीतील शुक्र बुध मन  आनंदी ठेवतील. आज नौकरी व्यवसाय उत्तम राहील. दिवस मध्यम.

तुला

आज दिवस एकत्र फिरणे, खरेदी, समारंभाचे आयोजन करण्यात जाणार आहे. अध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ.

वृश्चिक

आज शरीर थकलेले, अणि मन संभ्रमात राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक येणारे खर्च त्रास देतील. प्रकृती कडे लक्ष द्या. भावंडाची भेट होईल  दिवस बरा आहे.

धनू

पंचमात चंद्र, गुरूकृपा होण्यास उत्तम दिवस. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. भाग्य साथ देणार आहे. दिवस आनंदात घालवा.

मकर

आज चतुर्थ चंद्र घरातील विशेष जबाबदारी पार पाडा असे सुचवतो आहे. जास्तीचे काम, ऑफिस मध्ये अचानक काम येईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवस चांगला.

कुंभ

आज अष्टमात शुक्र काही विशिष्ट  चिंता सतावू शकते. आज प्रवास योग  येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने  तुम्ही अडचणी आल्या तरी सामना कराल. एकूण दिवस मध्यम.

मीन

आर्थिक गणित अगदी चोख राहील. प्राप्तीचा दिवस आहे. त्यासाठी काही प्रयत्‍न करा. कुटुंबासाठी खर्च करायला तुम्ही तयार असाल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya