आज 27 ऑक्टोबर 2021 बुधवार तिथी अश्विन कृष्ण सप्तमी. चंद्र आज पुनर्वसू नक्षत्रात असेल. तिथून तो गुरूशी नव पंचम योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
तृतीय चंद्र नेहमी संवाद वाढवण्यासाठी येतो. त्यात गुरू चंद्र योग. तुमचे बोलणे सर्वाना प्रभावित करेल. सप्तम मंगळ आकर्षक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. दिवस उत्तम.
वृषभ
आर्थिक प्राप्ती, मेजवानी, कुटुंबीयांसाठी आजचा दिवस शुभ आहे. छान खरेदी कराल. बुद्धी चा उत्तम वापर करून शिक्षणात भरघोस यश मिळेल. सप्तम शुक्र वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण करेल.
मिथुन
राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे.आज दैवी शक्ति मदत करतील. सूर्य पंचमात संतती साठी शुभ फळ देईल. अकस्मात खर्च होईल. दिवस शुभ.
कर्क
व्यय स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. तृतीय स्थानात बुध ओजस्वी वाणी आणि संभाषण चातुर्य वाढवेल. शुक्राचा प्रसन्न प्रभाव पंचम स्थानात संतती साठी विशेष खरेदी होईल. दिवस मध्यम जाईल.
सिंह
आज दिवस लाभदायक असून मित्र मैत्रिणींना भेटणे, मजेत वेळ घालवणे शक्य होईल. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. घराची नाविन्य पूर्ण सजावट कराल. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ.
कन्या
कार्य क्षेत्रात काही उत्तम संधी मिळतील. व्यवसाय उत्तम राहील. बुद्धी चातुर्याने नाव मिळवाल .आर्थिक बाजू ठीक राहील. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. दिवस चांगला जाईल.
तुला
भाग्य आज तुमच्यावर प्रसन्न आहे. आर्थिक लाभ, उत्तम खरेदी आणि घरात काही सौंदर्य पूर्ण सजावट असा हा दिवस तुम्हाला प्रसन्न ठेवेल. राशीतील रवि मंगळ थोडी प्रकृती जपा असा संकेत देत आहेत. दिवस शुभ.
वृश्चिक
अष्टमात चंद्र शारीरिक कष्ट, आर्थिक घडामोडी, अणि नोकरी पेशा व्यक्तींना त्रास दर्शवतो. मंगळ पोटाचे विकार देऊ शकतो. तुमच्या राशीचा स्वामी असल्याने व्ययस्थानी विशेष शुभ नाही. दिवस मध्यम .
धनू
साथीदार आज विशेष प्रसन्न राहील. व्यावसायिक प्रगतीचा दिवस आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. गुरु कुटुंबात सौहार्द निर्माण करेल. दिवस बरा जाईल.
मकर
आज दिवस फारसा अनुकूल नाही. नोकर त्रास देतील. प्रकृती मध्ये थोडा नकारात्मक प्रभाव राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो. दिवस बरा.
कुंभ
आज तुमच्या मुलांचा विशेष प्रभाव तुमच्यावर राहील भाग्यात मंगळ रवि धार्मिक रुची वाढेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजू चांगली राहील दिवस शुभ.
मीन
आज घरा संबंधी काही विशेष खरेदी, साफसफाई कराल. अष्टमात रवि मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहेत. प्रवास टाळा आज दिवस अनुकूल आहे.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.