Home /News /astrology /

राशीभविष्य: गुरू चंद्र दृष्टी योग या 4 राशींना देणार मोठं फळ

राशीभविष्य: गुरू चंद्र दृष्टी योग या 4 राशींना देणार मोठं फळ

आज शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर 2021 कार्तिक कृष्ण अष्टमी. आज चंद्र मघा नक्षत्रात सिंह राशीतून भ्रमण करणार असून तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. मेष, वृषभ, कर्क, सिंह राशींना मिळणार चांगलं फळ. पाहा तुमच्या राशीत काय?

आज शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर 2021 कार्तिक कृष्ण अष्टमी. आज चंद्र मघा नक्षत्रात सिंह राशीतून भ्रमण करणार असून तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. गुरु चंद्र दृष्टी योग हा शुभ फल देणारा ठरेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज  दिवस अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुल देखील आज तुमचा वेळ घेणार आहेत.  शुक्र भाग्यात , सुंदर वस्तु, कपडे आदी खरेदी कराल .दिवस  चांगला आहे. वृषभ आज दिवस तुम्हाला कामाला लावणार असे दिसते .पण काळजी नको, तुम्ही उत्साहाने  घरासाठी खरेदी कराल. . ऑफिस मध्ये  जास्तीचे काम पडेल.कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. दिवस उत्तम. कर्क अष्टमात  गुरू आणि तृतीय स्थानातील  मंगळ निश्चित पणे उलाढाल वाढवतील. भावा कडून फायदा होईल. तुमच्या मनाचा कल पाहून निर्णय घ्या.  सूर्य बुध उच्च शिक्षणात भरघोस यश देईल. दिवस चांगला. सिंह चंद्र गुरूच्या  सप्तमात असून तुमचे  व्यक्तिमत्त्व सर्वाना आकर्षित करेल.आर्थिक बळ राहील. विवाहासाठी काही चांगली  स्थळ येऊ शकतात. गुरु ची उपासना करावी. दिवस उत्तम  आहे. कन्या आज व्यय स्थानातील चंद्र तुम्हाला थकवून टाकणार आहे. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील..  भावंडांची भेट घडेल. दिवस मध्यम  आहे. तुला आज आपण आपण उत्कृष्ट ग्रहस्थितीचा  लाभ घ्यावा असे ग्रह सांगत आहे. चतुर्थ  शनि घरा संबंधी आनंदाची बातमी देऊ करील. चंद्र गुरु शुभयोग आहे. उत्तम लाभ होतील. ऑफिस मध्ये खूप काम  पडेल. पण त्याचा फायदा होईल. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमचा दिवस  काही महत्त्वाच्या मीटिंग्स, नवीन लोकाना भेटणे, मोठे निर्णय किंवा उशिरा पर्यन्त कामात जाणार आहे. कोणालाही लागेलसं बोलू नका.  प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. . दिवस उत्तम. धनु आज चंद्र भाग्यात आहे, काही  धार्मिक कार्य घडेल. किंवा प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून  बाहेर याल. त्यामुळे तुमचे  नाव होईल. वाहन जपून चालवा. दिवस शुभ आहे. मकर आज राशीच्या अष्टमात चंद्र भ्रमण असून मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. वाद टाळा. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी. दिवस  मध्यम आहे. कुंभ चंद्र सप्तमात असून जोडीदाराला उत्तम फळ देणारा आहे  संतती सुख मिळेल. आनंदाची वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल .दिवस  शुभ. मीन आज चंद्र षष्ठ स्थानात असून मामा मावशी कडील व्यक्ती भेटतील. आईला वेळ द्या .संतती चिंता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा राहील. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा आहे . शुभम भवतु!!
First published:

पुढील बातम्या