• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशीला आज होणार अनपेक्षित लाभ, पाहा तुमच्या राशीत काय

राशीभविष्य: या राशीला आज होणार अनपेक्षित लाभ, पाहा तुमच्या राशीत काय

आज दिनांक 27 ऑगस्ट 2021 शुक्रवार. तिथी श्रावण कृष्ण पंचमी/षष्ठी. आजच्या ग्रहस्थितीनुसार एका राशीला अनपेक्षित लाभ मिळायचा दिवस आहे.

  • Share this:
आज दिनांक 27 ऑगस्ट 2021  शुक्रवार.  तिथी श्रावण कृष्ण पंचमी/षष्ठी. चंद्र अश्विनी  नक्षत्रात राशीत उत्तररात्री पर्यंत असेल. आज बुध  कन्या राशीत  असुन शुक्राचा नीच भंग योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस समाधानात जाईल. आर्थिक लाभ होणार आहेत. संतती कडुन लाभ संभवतात. आरोग्य ठीक राहील. घराकडे लक्ष द्यावे लागेल.समारंभाचे  संकेत. बौद्धिक पातळीवर यश मिळवून देणारा दिवस चांगला जाईल. वृषभ आज तुमचा दिवस  निवांत जाणार आहे. खर्च अचानक वाढतील. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. संतती कडुन काही लाभ संभवतात. बौद्धिक प्रगती होईल. दिवस चांगला. मिथुन आज  अगदी निवांत दिवस घालवा. सध्या तुम्ही कामात  बिझी आहात, काही काम त्रासदायक ठरणार आहेत. भावंडाची काळजी  घ्या .प्रवास योग येतील. घरासाठी विशेष खरेदी कराल. दिवस शुभ आहे. कर्क आज तुम्ही घरातच बिझी राहणार आहात.ऑफिस मध्ये जास्तीचे काम  ,त्याचे नियोजन असा दिवस जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. धनलाभ होईल. दिवस शुभ. सिंह राशीतील मंगळ सूर्य उष्णतेचे विकार  देईल.धनस्थानातील बुध शुक्र आर्थिक लाभ देतील. स्वभाव जरा तापट होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य घडेल. कायदा पाळा. दिवस चांगला जाईल. कन्या आज तुम्हाला आराम करण्याची गरज भासेल. फार दगदग करू नका. प्रकृती सांभाळा. खर्च फार वाढणार आहे. पण अनपेक्षित लाभ ही होतील. दिवस मध्यम जाईल. तुला आज तुला राशीच्या व्यक्ती जोडीदाराला घेऊन फिरायला,जोडीने खरेदी करायला जाईल. दशमातील सूर्य कार्यक्षेत्रात मोठा अधिकार देईल.दिवस चांगला आहे. वृश्चिक प्रकृती सांभाळा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. आज कोणाशीही वाद नको. मात्र मंगळ लौकरच नवीन संधी उपलब्ध करून देईल. दिवस शुभ. धनु आज संतती साठी काही तरी काम करावं लागेल. त्यासाठी पैसा खर्च होईल. धार्मिक कार्य घडेल. किंवा प्लॅनिंग कराल.दशमातील बुध वाणिज्य क्षेत्रात यश देईल. एकूण दिवस शुभ आहे. मकर आज तुम्ही घरातली जास्तीची काम आटपून घ्याल. काही विशेष खरेदी होईल. प्रकृती ठीक राहील. वाहन जपून चालवा. भाग्यात  बुध शुक्र. आर्थिक गुंतवणूक करा. .दिवस शुभ. कुंभ सुट्टीचे निमित्त साधून आज जवळपास मौजमजेचे बेत कराल. काही महत्त्वाचे फोन येतील. अष्टमात ग्रह प्रकृती  जपा. भावंडाची भेट होईल. जोडीदाराचा मूड सांभाळा. दिवस चांगला जाईल. मीन आर्थिक ,शारीरिक अणि मानसिक सर्व बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहे. व्यवसाय अचानक भरारी घेईल. थकलेले देणे मिळेल. प्रकृती साथ देईल. कुटुंब सुख भरपूर मिळेल. दिवस चांगला आहे. शुभम भवतु!!
First published: