• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: पहिल्या आणि शेवटच्या राशीला दिवस आहे शुभ; तुमच्या राशीत काय आहे आज?

राशीभविष्य: पहिल्या आणि शेवटच्या राशीला दिवस आहे शुभ; तुमच्या राशीत काय आहे आज?

आज रविवार दिनांक 26 September 2021.षष्ठी श्राद्ध. मेष आणि मीन राशीला आजचा दिवस शुभ असणार आहे. बाकी राशींनी वाचा आपल्या भविष्यात काय?

  • Share this:
आज रविवार दिनांक 26 September 2021.षष्ठी श्राद्ध. चंद्र  आज वृषभ राशीत राहू  सोबत  आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष आज चंद्र  वृषभ राशीत  भ्रमण करणार आहे. गेले दोन दिवस जाणवणारा ताण संपून आज तुम्ही  कामाला सज्ज व्हाल. आर्थिक लाभ संभवतात  कुटुंब अणि घर  यांना  तुम्ही प्राथमिकता द्याल. घर  सजावट करण्याचा मूड येईल. दिवस  उत्तम आहे. वृषभ आज राशीतील  राहु चंद्र  भ्रमण तुम्हाला  हुरहूर लावेल.आर्थिक लाभ होतील. कारण नसताना मन व्यग्र राहील. पंचम स्थानातील  सूर्य   संतती सुख चांगले देईल. धैर्य आणि चिकाटी वाढवेल. ऑफिस मध्ये नेहमीच्या कामाचा ताण वाढेल.दिवस  बरा आहे. मिथुन आज व्यय स्थानातील  चंद्र राहू मनावर  सावट आणणार. आर्थिक  व्यय  संभवतो. राशी च्या चतुर्थ स्थानात सूर्य मंगल आहे, अधिकारी वर्गाची कुरकुर ऐकावी लागेल. धन, कुटुंब, वाणी या  बाबत जरा जपून . दिवस  मध्यम . कर्क लाभातील चंद्र राहू  अचानक मैत्रिणीकडून लाभ मिळवुन देईल. तुमच्या चांगल्या कामासाठी मदत मिळेल. आर्थिक बाजु चांगली राहील. वक्री गुरू  शनि सध्या तुम्हाला अनुकूल नाही. फारशी अपेक्षा  ठेऊ नका. दिवस बरा जाईल. सिंह कामाच्या ठिकाणी  काही तरी नवीन  समस्या  उत्पन्न होईल. त्याचे उत्तर शोधण्यात दिवस जाणार आहे. खर्च वाढेल. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा सल्ला  ऐकणे फायद्याचे ठरेल. दिवस बरा आहे. कन्या आज दिवस अनुकूल आहे. पण चंद्र राहू भाग्य स्थानात शुभ कार्याला अडथळा निर्माण करतील. लोकांवर तुमचा अपेक्षित प्रभाव पडणार नाही. प्रवास योग टाळा. दिवस शांततेत घालवा. तुला अष्टमात असलेले चंद्र राहू  विनाकारण  चिंता  लावतील .हुरहूर, कुठेतरी  वेदना  जाणवतील. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. गुरु कृपा  आहे. निभावून न्याल. दिवस मध्यम. वृश्चिक राशी समोरील  चंद्र राहू  मनाला हुरहूर लावणार आहेत. नवीन काम  सुरू करू नका. जोडीदाराकडून फार अपेक्षा करू नका व्यवसायात आज लाभ संभवतात. दिवस बरा आहे. धनु षष्ठ स्थानातील चंद्र राहू भ्रमण आणि  दशमातील मंगळ तुम्हाला शारीरिक त्रास दर्शवतात. आज कुठल्याही प्रकारचे धाडस नकोच. स्वतःला चांगल्या कामात गुंतवून दिवस शांततेत घालवा. मकर आज पुन्हा कुठल्याही दवाखान्याची  वारी होऊ शकते. मुलांसाठी किंवा कोणाला मदत म्हणून तुमची गरज लागेल. मुलांसाठी काही कारणाने मन चिंतित राहील. आर्थिक बाजू ठीक. सांभाळून राहावे. दिवस मध्यम आहे. कुंभ आज तुम्ही तुमच्या स्वतः साठी  काही वेळ द्याल. काही घरात जास्तीचे काम असेल  तर ते आधी  करून  मग दिवस  शांततेत,घरात घालवाल. काही वाचन किंवा  झोप घ्याल. दिवस बरा आहे. मीन आज  अचानक काही  प्रवास योग येतील. काही  महत्त्वाचा संवाद साधावा लागेल. पण त्यात काही  गैरसमज  होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. प्रकृती चांगली राहील. दिवस शुभ. शुभम भवतु!!
First published: