• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • राशीभविष्य: 4 राशींनी आज थोडं सांभाळून; तणावाचे प्रसंग टाळा

राशीभविष्य: 4 राशींनी आज थोडं सांभाळून; तणावाचे प्रसंग टाळा

आज दिनांक 26 ऑक्टोबर 2021 वार मंगळवार आज अश्विन कृष्ण षष्ठी आहे. चंद्र आर्द्रा नक्षत्रात मिथुन राशीत असणार आहे. कुठल्या राशींना आजचा दिवस शुभ वाचा..

 • Share this:
  आज दिनांक 26 ऑक्टोबर 2021 वार  मंगळवार आज  अश्विन कृष्ण  षष्ठी  आहे. चंद्र आर्द्रा नक्षत्रात  मिथुन राशीत असणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस अनुकूल असून काही विशेष बोलणी  होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती कडे थोड लक्ष असू द्या. कार्यक्षेत्रात विशेष भरारी घ्याल. दिवस शुभ. वृषभ आर्थिक स्थिती मध्ये भरभराट देणारा हा दिवस आहे. दोन दिवस जाणवणारा ताण कमी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन घडामोडी होतील. दिवस चांगला जाईल. मिथुन आज राशीतील चंद्र  तुम्हाला  आनंदी ठेवेल. परदेशी जाण्याची संधी  येऊ शकते. त्यासंबंधी काही चर्चा होईल. धार्मिक कार्य निष्ठेने कराल. कला  प्रकारांमध्ये रुची वाढेल. दिवस उत्तम. कर्क आज उदास मन  अणि थकवा यापासून जपा. काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. तुमच्या राशी च्या तृतीय स्थानात असलेला  बुध  तुम्हाला योग्य मार्ग सुचवेल. दिवस मध्यम आहे. सिंह आज अनेक प्रकारे  लाभ होतील. मित्र मैत्रिणींसोबत आनंदात दिवस घालवा. शक्यतोवर एकट्याने प्रवास टाळा. प्रकृती कडे लक्ष असू द्या. दिवस शुभ. कन्या आज काही घडामोडी मुळे तुमच्या  कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल .घराकडे सुद्धा खूप लक्ष देणे आवश्यक आहे. धन स्थानातील मंगळ डोळ्यांची काळजी घ्या असे सुचवीत आहे. दिवस चांगला जाईल. तुला आज दिवस शुभ असुन भाग्य तुमची साथ देणार आहे. कालपर्यंत जाणवणारा निरुत्साह  आणि प्रकृतीची तक्रार आज कमी होईल. ईश्वरी उपासना सफल होईल. दिवस शुभ. वृश्चिक आज शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. प्रवास टाळा. कोणाशी वाद, गैरसमज टाळा. आज दिवस घरात शांततेत  नामस्मरण करण्यात घालवा. दिवस मध्यम जाईल. धनु आजचा दिवस  हा व्यवसाय, भागीदारीमध्ये सामंजस्य  निर्माण करणारा आहे. कामाच्या ठिकाणी अचानक काही  जास्तीचे काम येईल. लाभ स्थानात रवि संततीची प्रकृती थोडी नाजूक ठेवेल. दिवस मध्यम. मकर राशीतील शनि आणि षष्ठ चंद्र आज तुम्हाला सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. कुटुंबात मतभेद, खर्चात वाढ आणि एकूण निरुत्साह राहील. दिवस मध्यम. कुंभ आज पंचम चंद्र गुरूशी शुभ योग करीत आहे. दिवस आनंदात जाईल. आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देणारा दिवस आहे. संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. दिवस शुभ. मीन घर अणि कुटुंब यात आज रमून जाल. घरात काही विशेष काम उरकून घ्या. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. बाकी दिवस आनंदात जाईल. शुभम भवतु!!
  First published: