• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: आजचा गुरुपुष्यामृताचा योग मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी असणार खास

राशीभविष्य: आजचा गुरुपुष्यामृताचा योग मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी असणार खास

आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक कृष्ण षष्ठी. आज चंद्राचे भ्रमण पुष्य नक्षत्रात होणार आहे. गुरुपुष्यामृत योग हा आध्यात्मिक साधना, ग्रंथ पारायण, मौल्यवान वस्तूची खरेदी, तसेच रत्न, सुवर्ण खरेदी यासाठीअतिशय शुभ मानला जातो.

  • Share this:
आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक कृष्ण षष्ठी. आज चंद्राचे भ्रमण पुष्य नक्षत्रात  होणार आहे. आज गुरूपुष्यामृत आहे. आध्यात्मिक साधना, ग्रंथ पारायण, मौल्यवान वस्तूची खरेदी, तसेच रत्न, सुवर्ण खरेदी यासाठी हा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष या राशीच्या व्यक्ती साठी  आजचा दिवस उत्तम असुन घरांमधे काही विशेष काम निघू शकते. सुट्टी घेऊन आराम करावा अशी इच्छा होईल. आईशी भेट होईल. धार्मिक कारणासाठी खर्च होईल. गुरु पुष्य योग शुभ. दिवस चांगला. वृषभ राशीच्या  तृतीय स्थानातून चंद्र भ्रमण होत आहे.फोन येतील. भावंडाची गाठभेट होईल .संघर्ष टाळा. . छोटे प्रवास  संभवतात.  जोडीदाराची साथ लाभेल. दिवस आनंदाने  व्यतीत होईल. मिथुन राशी च्या धन स्थानी असलेला चंद्र आर्थिक बाजु सांभाळेल. आनंदात दिवस व्यतीत  होईल .धार्मिक कामा करता खर्च कराल.सुंदर वस्तु खरेदी कराल. घरात  समाधानकारक  वातावरण राहील. शुभ दिवस. कर्क आज  राशिस्थानी चंद्र  ,चतुर्थ मंगळ भ्रमण  तुम्हाला  आग्रही बनवेल. पैसा  खर्च होईल. दिवस  काळजीपूर्वक घालवा. गुरु कृपा आहे. विशेष खरेदी उरकून घ्या. दिवस शुभ. सिंह राशीच्या व्ययस्थानातील  चंद्र  काही ताण निर्माण करेल. खर्च होतील. आज दिवस  मध्यम आहे. कायदा  व सुव्यवस्था सांभाळुन रहा. कलेत रुची वाढेल. गुरूची दृष्टी फायद्याची. दिवस मध्यम आहे . कन्या राशीच्या लाभ स्थानातील चंद्र  शुभ असुन प्रगतीचा नवीन  मार्ग  निघेल. अचानक   मित्रांचे फोन येतील. गाठीभेटी होतील. मौजमजा करण्याचा दिवस . काळजी नको. दिवस चांगला जाईल. तुला आज दिवस कार्यालयीन कामकाज करण्यात  घालवा. मानसिक ताण कमी होईल. थोडा वेळ  स्वतः साठी ठेवावा. घराकडे  लक्ष द्यावे.  भारी वस्तूची खरेदी कराल. दिवस मध्यम  आहे. वृश्चिक कर्क राशीतील,  चंद्र आध्यात्मिक  कल  वाढवतो .  राहु  सप्तमात  ,मंगळ व्यय स्थानात अशी ग्रह स्थिती  अनुकूल आहे. प्रवास सांभाळून करा. गुरुकृपा  आहे. शुभ दिवस. धनु आज धनु राशीच्या व्यक्तींनी काळजी  घ्यावी. वाहन जपून चालवावे.  त्रास होण्याची शक्यता  आहे. कार्यक्षेत्रात काहीसा संथ दिवस. गणेश उपासना फायद्याची ठरेल. . दिवस मध्यम . मकर राशी च्या समोरील चंद्र,  राशिस्थानी शनी पंचमात  राहु ही  ग्रहस्थिती अचानक आरोग्याचे प्रश्न उद्भवतील असे सुचवत आहे. मुलांच्या प्रकृतीला सांभाळून राहावे.  उपासना  करत  रहावी. कुंभ प्रकृतीकडे लक्ष द्या, राशी च्या व्यय स्थानातील शनि, चतुर्थात राहू  ही  ग्रह स्थिती  आहे.  बदल  घडले तर  बरे असे वाटेल.मानसिक आंदोलने होतील. . दिवस मध्यम आहे. गुरु पुष्य शुभ योगाचा लाभ घ्या. मीन पंचमात चंद्र  संतती कडे लक्ष द्या असे सुचवतो.काही शुभ वर्तमान येऊ शकते. शनी देव  साथ देतील. कुटुंबा  सोबत  वेळ घालवावा . .गुरूची उपासना  करावी. दिवस चांगला आहे. शुभम भवतु.
First published: