• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: पंचमातले चंद्रभ्रमण कुंभ राशीला देणार उत्तम फळ; 2 राशींनी मात्र प्रकृती जपावी

राशीभविष्य: पंचमातले चंद्रभ्रमण कुंभ राशीला देणार उत्तम फळ; 2 राशींनी मात्र प्रकृती जपावी

आज बुधवार दिनांक 24 नोव्हेंबर 2021. कार्तिक कृष्ण पंचमी. . चंद्र मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात असेल. सायंकाळी चार नंतर चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. याचा तुमच्या राशीवर परिणाम काय? वाचा दैनंदिन राशीभविष्य

  • Share this:
आज  बुधवार दिनांक  24 नोव्हेंबर  2021.  कार्तिक कृष्ण पंचमी. . चंद्र मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात असेल. सायंकाळी चार नंतर चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष जनसंपर्क, मौज, आनंदी घटना, बहिण भावंडांची भेट , प्रवास  असा  हा दिवस  अतिशय  शुभ आहे. नित्य काम पार पडतील. दिवस चांगला. वृषभ राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण घरात आनंदाची बातमी आणेल. तर्‍हेतर्‍हे च्या भेटवस्तू  आर्थिक लाभ, मौजमजा  असा हा एकूण काळ  आहे.  दिवस उत्तम. मिथुन राशी स्थानातील चंद्र भ्रमण आज तुम्हाला अतिशय व्यस्त ठेवेल. कामात अडथळे येतील.  समारंभात खूप खर्च होईल. काही व्यवहार  सांभाळून करा. दिवस मध्यम . कर्क राशीच्या व्यय स्थानात असलेले चंद्र भ्रमण  प्रकृती जपा  असे सांगत आहे. प्रवास, त्यातून होणारे  खर्च, मुलांची काळजी, असा हा दिवस मध्यम  जाईल. जास्त दगदग करू नका. सिंह आज राशीच्या लाभ स्थानात होणारे चंद्र भ्रमण शुभ फळ देईल. मित्र मैत्रिणींना भेटणे, प्रवास, असा हा आनंदी काळ आहे. राशीच्या तृतीय स्थानात मंगळ भावंडा शी  मतभेद होतील. दिवस अनुकूल. कन्या खूप हौस मौज, आनंद देणारा हा सप्ताह एकूणच तुम्हाला व्यग्र ठेवेल. पण त्यातही मौज वाटेल. प्रवास योग आहेत. कामाच्या ठिकाणी अचानक नवी जबाबदारी येईल. दिवस अनुकूल. तुला भाग्यकारक घटना घडतील.  आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी योग आहे. संतती चिंता कमी होईल. ईश्वरी उपासना करावी. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. वृश्चिक चंद्र आता भाग्यस्थाना कडे निघाला आहे तरी अति दगदग करणे महागात पडू शकते. प्रकृती नाजूक राहील. थकवा, मानसिक ताण असा हा दिवस शांतपणे घरात घालवा. धनु आज दोघे मिळून काही तरी  छान खरेदी, घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय उत्तम राहील. दिवस चांगला. मकर आज राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण आहे, तुम्हाला आरोग्याची समस्या वाटेल. पैशाचे व्यवहार जपून करा. कोणाशी शाब्दिक वाद नको. दिवस मध्यम आहे. कुंभ राशीच्या पंचमात असलेले चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. नवीन संधी,शैक्षणिक क्षेत्रात यश, संतती सुख, घरात काही समारंभ असा हा दिवस आनंदात जाईल. मीन आज तुमचे लक्ष घरात असेल.  आवराआवरी ,स्वच्छता ,खरेदी, तयारीत  दिवस चांगला जाईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पती पत्नी एकमेकांना समजून घेतील. शुभ दिवस. शुभम भवतु!!
First published: