Home /News /astrology /

राशीभविष्य: वृषभेच्या व्यक्तींनी आज वाद टाळा, 5 राशींसाठी आहे दिवस चांगला

राशीभविष्य: वृषभेच्या व्यक्तींनी आज वाद टाळा, 5 राशींसाठी आहे दिवस चांगला

आज गुरुवार दिनांक 23 September 2021 तिथी भाद्रपद कृष्ण तृतीया. 5 राशींसाठी आजचा दिवस चांगला ठरणारा आहे.

    आज गुरुवार दिनांक 23 September  2021 तिथी भाद्रपद कृष्ण तृतीया. आज चंद्र सायंकाळी मेष राशीत प्रवेश करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दुपारपर्यंत व्ययस्थानातील चंद्र प्रकृतीची  काळजी घ्यावी असे सुचवतो आहे  मानसिक स्वास्थ्य कमी राहील. उत्तरार्ध जरा बरा राहील. दिवस मध्यम जाईल. वृषभ आर्थिक, शारीरिक व्यय दाखवणारा दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक येणारे खर्च, घरात काही वाद विवाद होऊ नये यासाठी प्रयत्‍न करा. दिवस बरा. मिथुन आज दिवस  सर्व सामान्य पणे जाईल. मनोबल चांगले राहील. ऑफिस मध्ये अतिशय बिझी दिवस. तुमचा उत्तम प्रभाव राहील. आर्थिक बाजू ठीक आहे. दिवस चांगला. कर्क कर्क व्यक्ती कार्यक्षेत्रात मोठी भरारी घेणार आहेत. राशीच्या  चतुर्थ स्थानातील सूर्य अधिकारी व्यक्तीशी भेट घडवेल. कौटुंबिक सुख मिळेल. नातेवाईक भेट देतील. घराचे योग येतील. दिवस चांगला आहे. सिंह आरोग्य अणि नकारात्मक मानसिकता या पासून जपा. काहींना अस्वस्थता वाटेल. दुपारनंतर मात्र  सुधारणा होईल. आर्थिक स्थिती सांभाळा. दिवस मध्यम. कन्या इतरांवर प्रभाव वाढेल. पण अचानक काहीतरी  हुरहुर, अस्वस्थता जाणवेल. आर्थिक, शारीरिक कष्ट होतील  कुठलेही धाडस करू नका. खर्च बेताने करा  दिवस मध्यम जाईल . तुला आज व्यवसाय पूरक दिवस असून  चांगले  लाभ होतील. नवीन खरेदी, फेरफटका आणि  चैनी साठी खर्च असा दिवस आहे.व् यय मंगळ आर्थिक व्यवहार जपून करा असे सांगत आहे. दिवस चांगला आहे. वृश्चिक आज संतती चे प्रश्न मार्गी लागतील. गुरुकृपा राहील. पण उत्तरार्ध  शारीरिक कष्ट दाखवत आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. एकूण दिवस शुभ जाईल. धनु आज कुटुंब ,नातेवाईक, संतती  याला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रॉपर्टीची कामं मार्गी लागतील. नोकरीमध्ये फार चांगले फळ मिळेल.  एकूण दिवस चांगला जाईल. मकर धाडस आणि चिकाटी या दोन गुणांनी आजचा दिवस सफल होईल. बहीण भावंड भेट, प्रवास, असा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला जाईल. कुंभ जुनं येणं वसूल होईल. आर्थिक घडामोडी घडतील. दुपार नंतर कुठेतरी जावे लागेल.त्यासाठी आज योग्य दिवस आहे जोडीदाराला खुश ठेवाल. दिवस चांगला जाईल. मीन मध्यम प्रकृती,  आणि आर्थिक लाभ  असा हा दिवस आहे. मानसिक ताण तणाव कमी होतील. शत्रूंचा पराभव होईल. संतती सुख चांगले मिळेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ. शुभम भवतु!!
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या