• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशींचा आज खर्चिक गोष्टींकडे कल, सांभाळून राहा!

राशीभविष्य: या राशींचा आज खर्चिक गोष्टींकडे कल, सांभाळून राहा!

आज दिनांक 23 ऑक्टोबर 2021, शनिवार तिथी अश्विन कृष्ण तृतीय/चतुर्थी चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहा तुमच्या राशीवर याचा काय परिणाम

  • Share this:
आज दिनांक 23 ऑक्टोबर 2021, शनिवार तिथी  अश्विन कृष्ण  तृतीय/चतुर्थी चंद्र आज वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष आज काही महत्त्वाची बोलणी होतील अडकलेले पैसे मिळू शकतात. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आरोग्य ठीक. दिवस चांगला जाईल . वृषभ राशीतील चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवेल. मात्र दैनंदिन कामे सुरळीत होतील. घर खर्च वाढता राहील. षष्ठ स्थानातील  ग्रहा मुळे शत्रू वर मात  करता येईल  .दिवस  बरा जाईल. मिथुन प्रकृतीची तक्रार असेल. खर्च तो ही अनावश्यक होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त जाणवेल  चतुर्थ बुध वास्तुसंबंधी निर्णय घेण्यास मदत करेल. .दिवस मध्यम आहे. कर्क आज नवीन परिचय होतील. लाभ स्थानातील चंद्र राहू  मित्रांपासून सावधगिरीचा इशारा देत आहेत.  खर्चिक गोष्टींकडे कल होईल. वाणी मध्ये तेज येईल. दिवस बरा आहे. सिंह राशी च्या तृतीय स्थानातील मंगळ तेजस्वी व्यक्तिमत्त्व,आणि वाणी  बहाल करेल  पण वाद नको.  दैनंदिन कामे मार्गी लागतील. घरासाठी सुंदर वस्तु खरेदी कराल .कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. दिवस चांगला जाईल. कन्या एखाद्या विशिष्ट व्यक्ती कडून त्रास किंवा मत्सर असे अनुभव येतील.जपुन रहा. भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती साठी अनुकूल आहे  तुमच्या बुद्धी चा वापर योग्य कामासाठी कराल. एकूण दिवस चांगला आहे. तुला अष्टमात राहू चंद्र दिवसाचे  कार्यक्रम   बिघडतील. काहीतरी  विचित्र  हुरहूर, प्रकृती ची कुरकुर राहील.  आर्थिक बाजु जरा बरी राहील. आरोग्य जपा. खर्च बेताने करा. दिवस मध्यम. वृश्चिक वैवाहिक जीवनात  संभ्रमात टाकणार्‍या काही गोष्टी घडतील. खूप मानसिक ताण आणि विचित्र  घटनांचा सामना करावा लागेल. पण आपल्या  मताशी  ठाम रहा. दिवस प्रतिकूल  आहे. धनु आज शरीर जरा  थकलेले असेल. पण हाताखालच्या व्यक्तींकडून काम होतील. मदत मिळेल. आर्थिक व्यवहार जपून. शत्रूवर नजर ठेवून रहा. दिवस ठीक आहे. मकर आज संतती चिंता सतत सतावू शकते. नवीन प्रश्न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात काहीशी संभ्रमावस्था राहील. खर्चाचे प्रमाण  वाढेल.  वाहन जपून  चालवा. दिवस  मध्यम जाईल. कुंभ काही वास्तु विषयक प्रश्न  आज निर्माण होतील. आज घरात जास्तीचे काम पडेल. आर्थिक लाभ होतील. अष्टमात बुध  आहे, नवीन  योजना सुरू करणे टाळा. दिवस शांततेत घालवा. मीन प्रवासात त्रास, नातेवाईकांना भेट किंवा खर्च, मानसिक अस्थिरता  असा हा दिवस आहे. अनेक फोन येतील.  भावंडाची काळजी वाटेल. मुलाखतीतून यश मिळेल. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
First published: