मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: आजचा अंगारक योग 5 राशींसाठी आहे भाग्यकारक

राशीभविष्य: आजचा अंगारक योग 5 राशींसाठी आहे भाग्यकारक

आज  23 नोव्हेंबर 2021 मंगळवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी  म्हणजेच  अंगारक चतुर्थी .

आज 23 नोव्हेंबर 2021 मंगळवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी .

आज 23 नोव्हेंबर 2021 मंगळवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी .

आज  23 नोव्हेंबर 2021 मंगळवार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी  म्हणजेच  अंगारक चतुर्थी . आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करणार असून बुध सूर्य केतू  वृश्चिकेत असणार आहेत. गुरु कुंभ राशीतून  चंद्राशी

नव पंचम योग करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस संथ, शांत  आणि नेहमी प्रमाणे जाईल. आर्थिक स्थिती ठीक . प्रकृती ठीक राहील. कौटुंबिक सुख लाभेल.  फोन येतील . दैनंदिन कामे करीत रहा. दिवस  चांगला आहे.

वृषभ

खर्च जरा जपून करा. राशी च्या धन स्थानातील चंद्र आर्थिक स्थिती भक्कम करेल. दशमातील गुरू  शुभ फळ देईल.  प्रकृती ठीक राहील. दिवस उत्तम आहे.  .

मिथुन

आज राशी स्थानातील  चंद्र  मध्यम फळ देण्यास सज्ज आहे. व्ययस्थानातील राहू, अणि पंचम स्थानातील मंगळ आर्थिक  बाजु सांभाळा असे सुचवतो आहे. घरातल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मध्यम.

कर्क

आज दिवस  खर्चिक आहे. चंद्र व्ययस्थानात असून आज कोणतीही नवीन जबाबदारी आली तर  त्रास होईल. दिवस शांत कुटुंबीयांसोबत घालवा. मध्यम  दिवस .

सिंह

लाभ स्थानातील चंद्र  आज निश्चित पणे शुभ फळ देईल. आरोग्याच्या तक्रारी कडे मात्र लक्ष द्या. दिवस संथ व नेहेमीसारखाच जाणार आहे. खर्च जपून करा. मध्यम दिवस.

कन्या

दशमस्थानातील चंद्र भ्रमण प्रश्न उभे करेल. अचानक नवीन घटना घडतील. परिवारा सोबत घरी शांततेत दिवस काढणे उत्तम. फार उलाढाली करू नये. दिवस मध्यम .

तुला

आज कौटुंबिक  सहल, मौजमजेसाठी वेळ काढला तर आनंद वाटेल. पैसा  घरगुती कारणांसाठी खर्च होईल. भाग्यात चंद्र   आनंद निर्माण करील .प्रवासात काळजी घ्या. दिवस शुभ.

वृश्चिक

आज मन आणि शरीर थकलेले राहील. आज पैशाचे व्यवहार करू नका. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका. निराशा होईल. खर्च बेताने. दिवस अनुकूल नाही.

धनू

आज  जोडीदाराला  घेऊन फिरून येण्याचा दिवस आहे  आर्थिक व्यवहार जपून करा. बहीण भावंड चांगली बातमी देतील. मंगळ अधिक साहस करू नये असे सांगतोय. मध्यम दिवस .

मकर

आज घर  अणि कुटुंब यांच्या करता काही विशेष  प्लॅनिंग कराल. नातेवाईकांना भेट द्याल. त्यांना घेऊन बाहेर पडाल. मुलं आनंदात राहतील. दिवस  उत्तम जाईल.

कुंभ

आर्थिक बाजु चांगली राहील .आरोग्य सांभाळा. छोटे प्रवास, कार्य क्षेत्रात उत्तम प्रगती होईल. घरातल्या  अनुकूल घडामोडी  वाढतील. राशीतून भ्रमण करणारा गुरू शुभ संकेत देईल. दिवस उत्तम.

मीन

कौटुंबिक आणि आर्थिक सुख मिळणार आहे. घरी कोणीतरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रवास योग येतील.  दिवस  मौजमजेत कुटुंबातील व्यक्ती समवेत घालवा. शुभ दिवस आहे.

शुभम भवतु!!

First published: