• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मतभेद असतील तर मिटवून टाका; दोन राशींना जाणवू शकतो तणाव

राशीभविष्य: मतभेद असतील तर मिटवून टाका; दोन राशींना जाणवू शकतो तणाव

आज दिनांक 21 September 2021 मंगळवार. आजपासून महालय किंवा पितृपक्ष प्रारंभ होत आहे. तो 6 ऑक्टोबरपर्यंत असेल.

  • Share this:
आज दिनांक 21 September 2021. वार मंगळवार. तिथी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा. आजपासून महालय किंवा पितृपक्ष प्रारंभ होत आहे. तो  6 ऑक्टोबर  पर्यंत असेल. हिंदू धर्म संकल्पनेनुसार या काळात आपले पूर्वज सूक्ष्म रूपाने पृथ्वीवर वास करतात. तर्पण आदी  कर्मांचा स्वीकार करून आशीर्वाद देतात. तेव्हा या काळात सर्वानी पितृ कर्म करावे. पूर्वजांचे स्मरण करावे. चंद्र आज मीन राशीत असून पाहू या आजचे बारा राशींचे भविष्य. मेष पौर्णिमेच्या  पार्श्वभूमीवर दिवस  सहज पार पडेल. मधेच हुरहूर जाणवेल. आर्थिक स्थिती  मध्यम  राहील. घरात अशांतता होण्याचे  संकेत  आहेत. काळजी घ्या. वृषभ आज लाभस्थानातील चंद्र शुभ आहे. आनंदी दिवस. संततीशी काही मतभेद असतील तर  मिटवून टाका. आर्थिक लाभ, प्रवास संभवतो. दिवस उत्तम. मिथुन ऑफिस मध्ये जास्तीचे काम, दगदग असा आजचा दिवस आहे. प्रकृती नरम गरम राहील. सर्दी पडसे  अंग दुखणे असे त्रास होतील घरात अशांतता राहील. एकूण दिवस  मध्यम जाईल . कर्क चंद्र आज उत्तम फळ  देण्यास सज्ज आहे. मुले  आनंद देतील. स्त्रियांना मौज मजा, साज शृंगार करण्यास  उत्तम दिवस. आज  आपण या ग्रह स्थितीचा  फायदा  घ्या.आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. सिंह आर्थिक  बाबी  जरा  सांभाळून करा अष्टमात चंद्र घरांमधे वातावरण तणावपूर्ण राहील. चंद्र मंगळ शुभ योगात  आहे. स्त्रिया  घरात आज जास्त वेळ खर्च करतील. दिवस मध्यम जाईल कन्या आज चंद्र दिवसभर शुभ स्थितीत आहे. तुमच्यात एक प्रकारचे  तेज येईल. चिकाटीने  सर्व कामे पार  पाडाल. स्त्रिया  जोडीदारा सोबत आनंदाने घराबाहेर  पडतील. दिवस  उत्तम. तुला आज  प्रकृती थोडी अस्वस्थ राहील. तुमचे  कुठे  पैसे येणे  असेल  तर नक्की प्रयत्‍न करत रहा. कदाचित वसुली होईल. कुटुंब पाठीशी  असेल. त्यांना  वेळ द्या. दिवस  चांगला आहे. गोड बोला . वृश्चिक पंचमात चंद्र  मंगळाशी शुभ योग करीत आहे.व्यवसाय साठी  उत्तम योग. कामे मार्गी लागतील. संतती आज अतिशय आनंदाने सोबत राहतील. दिवस  शुभ. धनु घरात ज्यादा काम, अनपेक्षित अडचण  असा दिवस  आहे. बारीक सारीक  आरोग्याच्या  तक्रारी  जाणवत राहतील. पण काळजी करू नका. गुरु महाराज  समर्थ आहेत. दिवस  मध्यम . मकर पत्र, ईमेल, फोन, असे महत्त्वाचे  संपर्क आज करावे लागतील.  जोडीदार,स्त्री व्यक्ती  कडून फायदा  संभवतो. आर्थिक बाजू पक्की  असू द्या. भावंडे मदत करतील. दिवस लाभदायक. कुंभ कार्यक्षेत्रातून काही  शुभ  समाचार, किंवा  मनोबल  वाढवणारी घटना घडेल. आर्थिक  लाभ होतील. पण खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवस शुभ. मीन आज भाग्य तुमची साथ देणार आहे. मीन व्यक्ती तश्याच आनंदी असतात. आज   स्वतः साठी वेळ काढा. जोडीदार  आनंदी  राहील. छोटे  प्रवास  संभवतात. घर अणि मुलं यांकडे लक्ष द्या. दिवस  उत्तम आहे. शुभम् भवतु!!
First published: