Home /News /astrology /

राशीभविष्य: मेष, कर्क, वृश्चिक राशींनी आज जरा जपून! कुठल्या राशींना दिवस शुभ?

राशीभविष्य: मेष, कर्क, वृश्चिक राशींनी आज जरा जपून! कुठल्या राशींना दिवस शुभ?

आज दिनांक 21 ऑक्टोबर 2021.अश्विन कृष्ण प्रतिपदा. आज बुधवार आजचे ग्रहमान- चंद्र मेष राशीत असून बुध कन्या राशीत आहे.

आज दिनांक 21 ऑक्टोबर 2021.अश्विन कृष्ण प्रतिपदा.आज बुधवार आजचे ग्रहमान- चंद्र  मेष राशीत असून  बुध कन्या राशीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीत चंद्र मंगळ षडाष्टक असून दिवस नित्या प्रमाणे जाईल. प्रकृती संबंधी थोडी चिंता वाटेल. मुलांकडे जरा लक्ष द्या. तुमच्यावर लोकांची नजर राहील. जरा जपून रहा. दिवस बरा. वृषभ आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भ्रमण मानसिक आणि आर्थिक ताण देईल. थोडी चिडचिड होईल जास्तीची कामे गळ्यात पडतील. शांत रहा.दिवस मध्यम आहे. मिथुन राशीच्या लाभ स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. मित्र मैत्रिणींसोबत संवाद होईल. घरात काही सौंदर्य पूर्ण वस्तु खरेदी कराल. दिवस शुभ. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानातील सूर्य  कुटुंबातील व्यक्ती सोबत घरा संबंधित वाद निर्माण करेल. आर्थिक घडामोडी होतील. प्रवासाची आखणी कराल. दिवस उत्तम. सिंह आज भाग्य तुमची साथ देणार आहे.परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रकृती जपा. उष्णतेचे विकार त्रास देतील. चतुर्थ शुक्र केतू घरात काही समस्या निर्माण करतील. दिवस बरा जाईल. कन्या आज अष्टमात चंद्र  असून खूप दगदग होणार असे वाटते आहे. राशीतील मंगळ बुध मन   उद्विग्न ठेवेल.  द्वितीय स्थानात सूर्य  डोळ्यांचे विकार देईल. आज नोकरी व्यवसाय उत्तम राहील. दिवस मध्यम. तुला आज दिवस एकत्र फिरणे, खरेदी, समारंभाचे आयोजन करण्यात जाणार आहे. अध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. धार्मिक कार्य घडेल.राशीतील सूर्य  अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. दिवस शुभ. वृश्चिक आज शरीर थकलेले, अणि मन संभ्रमात राहील आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक येणारे खर्च त्रास देतील.  शुक्र हातून कलाकृती निर्माण करेल. प्रकृती कडे लक्ष द्या.  दिवस बरा आहे. धनू पंचमात चंद्र,गुरू कृपा होण्यास उत्तम दिवस. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल .आर्थिक स्थिती ठीक राहील. भाग्य साथ देणार आहे. दिवस आनंदात घालवा. मकर आज  चतुर्थ चंद्र घरातील विशेष जबाबदारी पार पाडा असे सुचवतो आहे. जास्तीचे काम, ऑफिस मध्ये अचानक काम येईल. दशमातील सूर्य  अधिकार बहाल करेल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवस चांगला. कुंभ आज दशमातील शुक्र काही विशिष्ट  घटना घडू शकते. आज प्रवास योग  येतील .तुमच्या बुद्धी चातुर्याने  तुम्ही अडचणी आल्या तरी सामना कराल. एकूण दिवस मध्यम. मीन आर्थिक गणित अगदी चोख राहील. प्राप्तीचा दिवस आहे. त्यासाठी काही प्रयत्‍न करा. कुटुंबासाठी खर्च करायला तुम्ही तयार असाल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या