• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मंगळ वाढवणार धुसफूस, कुठल्या राशीला आहे शांत राहण्याची गरज?

राशीभविष्य: मंगळ वाढवणार धुसफूस, कुठल्या राशीला आहे शांत राहण्याची गरज?

आज रविवार दिनांक 21 नोव्हेंबर 2021 कार्तिक कृष्ण द्वितीया. चंद्र आज रात्री पर्यंत वृषभ राशीत भ्रमण करीत आहे.

  • Share this:
आज रविवार दिनांक 21 नोव्हेंबर 2021 कार्तिक कृष्ण द्वितीया. चंद्र आज रात्री पर्यंत वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज आपल्या  संतापी स्वभावाला काबूत ठेवून काम करा. गुरु शुभ असून  लाभदायक  घटना घडतील. शुक्र जोडीदाराला उत्तम  आर्थिक लाभ देईल. दिवस चांगला आहे. वृषभ काही  जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल.  पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. सर्दी चा त्रास जाणवेल. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति  खर्च टाळा. दिवस मध्यम . मिथुन कामात आणि शिक्षणात  प्रगती होईल. प्रकृती  अस्वस्थ वाटत असेल  तर  आज जपुन रहा. खर्च वाढेल. मुलांकडे  जास्त लक्ष द्यावे लागेल. शनि महात्म्य वाचावे. कर्क चतुर्थ मंगळ थोडी  धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा लौकरच सगळे ठीक होईल. सप्तम शनि, जोडीदाराला  कष्ट देणारा ठरेल. घरातल्या शुभ घटनांची सुरवात.. दिवस अनुकूल आहे. सिंह कुटुंब हे तुमचे प्रेम आहे. आज दिवस समाधानात जाईल. राशी च्या  तृतीय स्थानातील मंगळ आणि दशम चंद्र  प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. दिवस  चांगला आहे. कन्या आज आर्थिक घडामोडी  होतील  कुटुंबियांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच  महत्व पूर्ण कामगिरी करतात. . आजही  दिवस तसाच आहे. चांगले फळ मिळेल. तुला अष्टमात चन्द्र, राशीत मंगळ.मातेचं  आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली  विजेची उपकरणे सांभाळून वापरा  दुरुस्ती निघू शकते. प्रकृती जपा. वृश्चिक राशी स्थानातील सूर्य, सप्तम चंद्र  मतभेद, कुरबुरी  घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय  घ्या. अचानक  छोटा प्रवास  संभवतो. जरा जपून रहा. धनु आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो  मित्रांशी वाद करु नका..नौकरी  व्यवसायातून लाभ  संभवतात. मात्र  सरळ मार्गाने जा. साडेसाती आहे तरी गुरुकृपेने मार्ग निघेल. मकर राशी स्थानात मार्गी होणारे शनी महाराज आप्तेष्टांना नाराज करू नका , त्यांना महत्व द्या.असे सुचवीत आहेत. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे .दिवस चांगला आहे. कुंभ दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे  प्रवास योग  येतील. भाग्य साथ देईल. शत्रू पिडा संभवते. पण विजय  तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही  धार्मिक कामात मन रमेल. मीन जरा जपून राहावे असे  ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा.. यश मिळेल पण प्रयत्नाने. संतती  कडे  लक्ष द्यावे लागेल.  प्रवास योग ,महत्त्वाचा फोन येईल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतु!!
First published: