• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशीने मोठे निर्णय किंवा आर्थिक देणंघेणं टाळा

राशीभविष्य: या राशीने मोठे निर्णय किंवा आर्थिक देणंघेणं टाळा

आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 तिथी अश्विन पौर्णिमा. ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना केली जाते.

  • Share this:
आज दिनांक  20  ऑक्टोबर 2021 तिथी अश्विन पौर्णिमा. ज्येष्ठ अपत्याला  ओवाळून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना केली जाते. आज चंद्र दुपार नंतर अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस समाधानात व शांततेत घालवा .राशीत प्रवेश करणार चंद्र  आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक स्थितीत  सुधार होणार आहे. दिवस शुभ आहे. वृषभ आज खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल.  मंगळ शत्रू पिडा करेल. नोकरीमध्ये तुमच्यासाठी  चांगला  दिवस आहे. काम पडले तरी फळ मिळेल. दिवस मध्यम. मिथुन आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहाल .लाभ होतील. चतुर्थ सूर्य अधिकार वाढ करेल. मंगळ घरासाठी खर्च करायला लावेल. फोन येतील. दिवस शुभ आहे. कर्क राशी च्या चतुर्थातील रवि  अणि तृतीय स्थानातील मंगळ  तुमच्यात एक प्रकारचा  रुबाब निर्माण करतील. लोकांवर तुमचा उत्तम प्रभाव पडेल. हाती घेतलेली कामे  नीट पार पडतील. नोकरीमध्ये वरिष्ठ खुश राहतील. सिंह आज भाग्य साथ देणार आहे. मोठ्या  जबाबदारीने तुम्ही काम पूर्ण कराल. राशी च्या धन स्थानातील मंगळ व  तृतीय शुक्र थोडा खर्च करेल. कायदा पाळा. चिकाटी आणि परिश्रम वाढणार आहेत. दिवस शुभ. कन्या आज राशी च्या अष्टमात चंद्र आहे. आर्थिक बाजु भक्कम असली तरी कुठेतरी  अशांती, हुरहुर वाटेल. चिंता करू नका . लौकरच चांगले क्षण येतील. दिवस  फार काही अपेक्षा न ठेवून  शांत पणे घालवा. तुला भागीदारी,व्यावसायिक निर्णय, आणि जोडीदाराचा योग्य सल्ला असा आजचा दिवस आहे.   राशीतील रवि तुमची कामे  सुरळीत मार्गी लावेल .भाग्य साथ देईल. दिवस चांगला आहे वृश्चिक आज फार मोठे निर्णय किंवा आर्थिक देणेघेणे टाळा. डोळ्याचे त्रास असतील तर लक्ष द्या. कोणाशीही  वाद नको. मात्र तुमचे  सहकारी साथ देतील. दिवस  मध्यम आहे. धनु द्वितीयात शनि अणि पंचमात चंद्र संततीचे प्रश्न निर्माण करतील. आर्थिक स्थिती सांभाळा. स्त्रियांना काही प्रकृतीच्या तक्रारी  असतील तर  लक्ष द्या. गुरू कृपा  आहे. दिवस बरा जाईल. मकर आज घरगुती प्रश्न डोकं वर काढतील. कोणाचे आजारपण, कोणाची मदत करावी लागेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला आहे. कुंभ आज छोटे प्रवास  ,मौजमजेसाठी खर्च, आणि एखाद्या विशिष्ट कामासाठी महत्त्वाचा फोन असा दिवस आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी बाहेर पडाल. दिवस शुभ. मीन आर्थिक प्राप्ती झाली,  तर खर्च उभे राहणारच. तेव्हा चिंता नको. मुलाबाळां साठी खर्च होणार आहे. घरासाठी नवीन वस्तु ,काही धार्मिक गोष्टी असा दिवस आहे. अष्टमात रवि विचित्र घटनांची सुरवात करेल. जपून रहा. शुभम भवतु!!
First published: