• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • राशीभविष्य: मकर राशीत घडतील अनपेक्षित घटना; कुठल्या राशींसाठी गोचर शुभ?

राशीभविष्य: मकर राशीत घडतील अनपेक्षित घटना; कुठल्या राशींसाठी गोचर शुभ?

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

आज 20 नोव्हेंबर 2021 शनिवार तिथी कार्तिक कृष्ण प्रतिपदा. आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे आज देव गुरू बृहस्पती रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी आपली नीच राशी मकर मधून कुंभ या शनिच्या स्थिर राशीत प्रवेश करीत आहे.

 • Share this:
  आज 20 नोव्हेंबर 2021 शनिवार तिथी कार्तिक कृष्ण प्रतिपदा. आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे आज देव गुरू बृहस्पती रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी आपली नीच राशी मकर मधून कुंभ या शनिच्या स्थिर राशीत प्रवेश करीत आहे. एप्रिलपर्यंत गुरू कुंभ राशीत मार्गी अवस्थेत राहणार असून तिथून तो मीन राशीत प्रवेश करेल. हे गोचर काही राशींना अत्यंत शुभ असून त्याबद्दल विस्ताराने साप्ताहिक राशी भविष्यात बघूया.आज चंद्र दिवसभर  रोहिणी या उच्च नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीस्वामी मंगळ सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी काही चिंता लागू शकते वादविवाद टाळा. धन स्थानात चंद्र अतिशय सुंदर अनुभव देईल. कौटुंबिक आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्रभ्रमण भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे. शुभ दिवस. वृषभ दिवसाचे नियोजन नीट करा. चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवेल. मात्र दैनंदिन कामे सुरळीत होतील. षष्ठ मंगळ प्रकृती चिंता लावेल. दिवस मध्यम जाईल. मिथुन राशी स्वामी बुध लवकरच स्थान बदल करणार आहे. व्यय स्थानात चंद्र राहू मानसिक आंदोलने दर्शवतो. आर्थिक दृष्ट्या त्रास होईल. कोणाशी वाद नको. दिवस मध्यम जाईल . कर्क आज  राशी स्वामी चंद्र दिवसभर रोहिणी नक्षत्रात असेल. अतिशय आनंदात दिवस जाईल. मौज मजा , मित्रांसोबत प्रवास येतील. आर्थिक स्थिती ठीक राहील.दिवस शुभ. सिंह आज राशीच्या दशमातील चंद्र भ्रमण महत्त्वाचा निर्णय घेण्यास मदत करेल. कार्यालयीन कामकाज करण्यात वेळ जाईल. घरात अनपेक्षित जबाबदारी अंगावर येईल. दिवस शुभ. कन्या आज चंद्र भ्रमण  शुभत्व घेऊन आले आहे. भाग्य स्थान जागृत आहे  अनेक  ठिकाणाहून   भाग्याची साथ मिळेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम. तुला राशीच्या अष्टमात चंद्र राहू योगाने थोडा कठीण दिवस जाईल. अतिशय काम, त्यामुळे थकवा, अंग दुखणे, पाठीचे त्रास  संभवतात. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ बुध व्ययस्थानात, तर चंद्र राहू सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी त्रास दर्शवतो. मात्र शुक्र शुभ असुन अनेक ठिकाणाहून आर्थिक प्राप्ती होईल. तेजस्वी व्यक्तिमत्त्व होईल. दिवस चांगला. धनु षष्ठ चंद्र राहू अकल्पित  दुखणे, दूरच्या व्यक्तीची अनपेक्षित भेट, तसेच आर्थिक गडबड असे फळ देईल.   राशीतील शुक्र सौम्य व्यक्तिमत्त्व बहाल करेल. खर्चाचे प्रमाण वाढते ठेवेल. दिवस मध्यम मकर राशीच्या पंचम स्थानातील चंद्र संतती सुख देईल. अनपेक्षित घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात मध्यम यश देणारा काळ आहे. खर्च वाढता राहील. प्रवास योग आहेत. दिवस शुभ. कुंभ राशी स्वामी शनि व्यय स्थानात थोडा कठीण काळ आहे. नोकरी पेशा व्यक्तींना  कष्ट पडतील .घरात काही वाद विवाद होऊ शकतात. जास्तीची जबाबदारी येऊ शकते. दिवस बरा. मीन प्रवास योग,त्यात येणार्‍या अडचणी  भावंड भेट असा हा दिवस अतिशय गडबडीत जाईल. खूप फोन येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. दिवस चांगला जाईल. शुभम  भवतु!!
  First published: